चाळीसगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे राज्यसभा सदस्य छत्रपती युवराज संभाजीराजे व माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवाजी महाराज चौक, चाळीसगाव येथे अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार रक्षाताई खडसे या प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या.
चाळीसगाव येथे ३५ वर्षाची प्रतिक्षा तसेच खा.उन्मेशदादा पाटील व आ.मंगेशदादा चव्हाण यांच्या सतत ७ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर सदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण प्रत्यक्षात साकार होत आहे.
यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री आ. गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सुरेश (राजुमामा) भोळे, खा.उन्मेशदादा पाटील, आ.मंगेशदादा चव्हाण, आ.संजयजी सावकारे, मा.आ.चंदुलाल पटेल, माजी आ.स्मिताताई वाघ, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, नगराध्यक्ष आशलता चव्हाण ई. प्रमुख उपस्थितीत होते.