नवी दिल्ली (वृत्तसंस्था) यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी परीक्षेमध्ये मुलींनी हॅट्ट्रिक मारली आहे. यावेळी श्रुती शर्मा यूपीएससी परीक्षेत अव्वल ठरली आहे. श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
पहिल्या तीनही क्रमांकावर मुली आहे. श्रुती शर्मा ही देशात पहिली आलीय. तर दुसऱ्या क्रमांकावर अंकिता अग्रवाल तर तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला आहे. टॉप फाईवमध्ये फक्त एकच मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे उत्कर्ष द्विवेदी. चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा मुलगीच आहे आणि ती आहे ऐश्वर्या वर्मा. टॉप फाईव्हमध्ये एकही मराठी नाही हेही निकालाचं वैशिष्ट्य मानावं लागेल. शर्मा, अग्रवाल, वर्मा, द्विवेदी हे नेमके कोणत्या राज्यातले रहिवाशी आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण यादीवर एक नजर टाकली तर मराठमोळी आडनावं मात्र शोधूनही सापडणे अवघड आहे. विशेषत: टॉप 10 मध्ये तर नाहीच.
2021 मध्ये यूपीएससीनं मुख्य परिक्षेचं आयोजन केलं होतं तर जानेवारी 2022 मध्ये उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्यांची निवड झालेली आहे, ते उमेदवार IAS, IPS, IFS आणि केंद्रीय सेवेतल्या A आणि B ग्रुपमध्ये प्रशासकिय सेवा देतील. एकूण 685 उमेदवारांची निवड झालीय. त्यात जनरल कॅटेगरीचे 244, ईडब्लूएसचे 73, ओबीसीचे 203, एससीचे 105, एसटीचे 60 अशा उमेदवारांचा समावेश आहे. एकाचा निकाल आयोगानं राखून ठेवलेला आहे.
यूपीएससीचा जो निकाल आलाय, त्यात महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. तिची ऑल इंडिया रँक 13 वी आहे. टॉप 15 मध्ये दिसणारं हे एवढं एकच नाव आहे. पहिल्या 15 मध्ये कोण कोण आहे, त्यांची नावं खालील प्रमाणे
ऑल इंडिया रँक
6- यक्ष चौधरी
7- सम्यक जैन
8- इशिता राठी
9- प्रीतमकुमार
10- हरकिरतसिंग रंधवा
11- शुभांकर प्रत्यूष पाठक
12- यशरथ शेखर
13- प्रियंवदा अशोक म्हाडदळकर
14- अभिनव जैन
15- सी यशवंतकुमार रेड्डी
काही मराठी नावं
दिक्षा जोशी
शुभांकर पाठक
सोनाली देव
अंकिरृत दास
निखिल महाजन
अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे
प्रखर चंद्राकर
चारू धनकर
पंकज यादव
अजेय राठोर
आदित्य काकडे
मयंक पाठक
अनन्या अवस्थी
निखील बसवराज पाटील
विनय कुमार गदगे
लोकेश यादव
आशू पंत
ओंकार मधुकर पवार
अक्षय अनिल वाखारे
अक्षय संजय महाडिक
तन्मयी सुहास देसाई
अभिजीत राजेंद्र पाटील
परूल यादव
तन्मय काळे
इशान अजित टिपणीस
सोहन सुनिल मांढरे
सौम्यरंजन प्रधान
दीप रामचंद्र शेठ
वैभव नितीन काजळे
आकाश जोशी
उषा यादव
राहुल देशमुख
विमल कुमार पाठक
सुमित सुधाकर रामटेके
शुमैला चौधरी
अभिषेक यादव
देवराज मनिष पाटील
अनिकेत लक्ष्मिकांत कुलकर्णी
राजेंद्र चौधरी
निरज विजय पाटील
आशिष अशोक पाटील
अमित लक्ष्मण शिंदे