नागपूर (वृत्तसंस्था) नागपूरमध्ये अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी देवगिरी बंगल्याला 10 फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर, सुरक्षा भिंतीवर काटेरी तार लावण्याच्या देखील पोलिसांच्या सूचना आहेत.
येत्या 19 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने नागपूरमध्ये अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहेत. नागपुरातील रविभवन परिसरात उपमुख्यमंत्र्यांचा देवगिरी बंगला आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे चिन्हं आहेत. शिवाय अधिवेशनावर असंख्य मोर्चे येणार असल्याने या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी देवगिरी बंगल्याला 10 फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तीन वर्षानंतर पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याने या अधिवेशनात असंख्य मोर्चे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान भवन परिसर आंदोलनाने गजबजलेला असणार असल्याने राज्य सरकारकडून सुरक्षतेची काळजी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून फडणवीस यांच्या बंगल्याला सुरक्षा भिंत बांधली जात असल्याची चर्चा आहे.