औरंगाबाद (वृत्तसंस्था) महाराष्ट्रासह देशभरात राज्यकर्ते पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. पण पेट्रोलचे भाव हे केंद्र सरकार निश्चित करत नाही तर अमेरिका ठरवते, असा अजब दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
देशात आणि राज्यात पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत, पण आपण यावर काही बोलणं योग्य नाही असं सांगत रावसाहेब दानवे म्हणाले की, “पेट्रोलचे दर हे आता जागतिक बाजाराशी लिंक केलेले आहेत. त्यामुळे या किंमती वाढण्यामागे केंद्र सरकारचा हात नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती या रोज खाली-वर होतात. या किंमती आता अमेरिकेत ठरवल्या जातात. त्यामुळे केंद्र सरकारला यावरुन दोष देणं चुकीचं आहे.”
केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी केल्याने त्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व्हॅट कमी करत नाहीत असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.