फैजपूर (प्रतिनिधी) कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर सक्तीने करावा, गर्दी करू नये. ऐकत नसेल त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करा असे आदेश प्रांत कैलास कडलक यांनी दिले आहे.
फैजपुर नगर परिषद तसेच पोलीस प्रशासन यांनी एकमेकांच्या सहकार्यातून कोरोना संसर्गावर उपायोजना, खबरदारी घ्यायची आहे. भाजी विक्रेते, व्यापारी, फेरीवाले, दूध विक्रेते यांनी मास्कचा वापर नियमित करावा, तसेच विना मास्क नागरिकांकडून दंडाची वसुली करावी, असेही प्रांत कैलास कडलक बजावून यांनी सांगितले.
नगरपरिषद सभागृहात गुरुवारी संध्याकाळी लोकसहभागातून कोव्हिडं सेन्टरला ६० ऑक्सिजन बेड तयार करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, प्रांताधिकारी कैलास कडलग, शास्त्री भक्ती किशोर दास महाराज, नगराध्यक्ष महानंदा होले, सपोनी प्रकाश वानखडे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, सुनील वाढे यांचेसह व्यापारी बंधू उपस्थित होते.
या बैठकीत सध्या कोविड रुग्ण आपल्या भागात मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यासाठी आपल्या फैजपूर सावदा परिसरात काही रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी उपचारासाठी पाठविले जात आहे. गोरगरीब रुग्णांचे जीव वाचावे यासाठी साखर कारखान्याजवळ ६० ऑक्सिजन बेडची सुविधा सुरु करण्यासाठी सदरची बैठक घेण्यात आली.
यासाठी जवळपास पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे तेव्हा सर्वांनी आवाहन करून निधी उभा करावा असे ठरले. यात काही दात्यांनी पुढाकार घेऊन स्वेच्छा निधी घोषित केला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, ताप असल्यास तात्काळ तपासणी करून औषधी घ्यावी. गर्दी करू नका, कामाशिवाय बाहेर पडू नये. कोरोना तपासणी सर्व नागरिकांनी करावी असे आवाहन प्रांत कैलास कडलग यांनी केले.
महामंडलेश्वर जनार्दन नदीची महाराज यांनी मागील कोरोना लाटेत जनतेने उस्फूर्तपणे सहकार्य केले होते. त्यावेळी आपण ३० ऑक्सिजनयुक्त खाटांची लोकसहभागातून तात्काळ उभारणी केली होती. यावेळी कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता साठ ऑक्सिजन बेडची आवश्यकता आहे. यामुळे जवळपास ९० बेड तयार होतील असे नियोजन आहे. नागरिकांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.