जळगाव (प्रतिनिधी) इंस्टाग्राम या सोशल मिडीया साईटवर एका मुलीच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून वापर करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्थानकात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १२ जून २०२२ ते दि. १७ जून २०२२ पावेतो कोणीतरी अज्ञात इसमाने इंस्टाग्राम या सोशल मिडीया साईटवर muskan d 555असे नांव असलेल्या बनावट अकाऊंट वरुन स्वतःची ओळख लपवून मुलीची बदनामी व्हावी या उद्देशाने इंस्टाग्राम सोशल मिडीया साइटवर मुलीच्या नावाचा व फोटोचा वापर केला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्थानकात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि लिलाधर कानडे हे करीत आहेत.