अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, याचाच भाग म्हणून ग्रामीण भागात लसीकरणावर भर देण्यात आला आहे. दहिवद आरोग्य उपकेंद्रात ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे.
दहिवद आरोग्य उपकेंद्रात ५० पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले असून, अजून दोन दिवसात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात नेटवर्क प्रॉब्लेममुळे ऑनलाइन नोंदणी साठी तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे लसीकरणाला मर्यादा येत आहेत.
लसीकरणासाठी ग्रामपंचायतीतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सरपंच सुषमा देसले तसेच डाॅ. संजय पाटील, घनश्याम पाटील, आरोग्य साहाय्यक खुशाल पाटील, आरोग्य सेवक पी एस भदाणे, आर एस पाटील, आरोग्य सेविका पाडळेताई, आशा सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.