अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी आता शासनातर्फे कोविड लसीकरणाला सुरवात करण्यात आलेली आहे. याचाच एक भाग म्हणून जानवे आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षावरील व्याधी असलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेणे क्रमप्राप्त आहे.
यावेळी रणाईचे महानुभाव आश्रमचे प्रमुख बिडकर महाराज यांना सर्वप्रथम लस देण्यात आली. यावेळी जि. प. सदस्या सोनू पवार, माजी पं. स. सभापती शाम अहिरे, माजी सभापती रेखाताई नाटेश्वर पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटोळे उपस्थित होते. तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व आरोग्य उपकेंद्रनावर लसीकरणाला सुरवात झालेली आहे. असे प. स. सभापती त्रिवेणाबाई शिवाजी पाटील यांनी कळविले आहे.