जळगाव (प्रतिनिधी) कोरोना लसीकरणाच्या चौथ्या दिवशी जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागातील ५४३ आरोग्य सेवकांनी कोरोनाची लस घेतल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात शनिवारी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर आज चौथ्या सत्रात जिल्ह्यात सात लसीकरण केंद्रावर प्रत्येकी १०० याप्रमाणे जिल्ह्यातील ७०० आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणेने केले होते. त्यानुसार आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ६६, महापालिकेच्या डी. बी. जैन हॉस्पीटलमध्ये १००, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा ७८, जामनेर ६०, तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा ७८, चाळीसगाव १०० आणि न. पा. भुसावळ येथील केंद्रावर ६१ असे एकूण ५४३ म्हणजेच ७७.६ टक्के आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्यात आली. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.