नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या दहा महिन्यांपासून संपूर्ण देशावासियांना वेठीस धरणारं कोरोना संकट आता थांबण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारनं देशभरात लसीकरणआच्या तारखेचीही घोषणा केली. येत्या १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या करोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणासंबंधी तयारींची माहिती घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोज करण्यात आलं होतं. यासोबत केंद्र सरकारनं देशभरात लसीकरणआच्या तारखेचीही घोषणा केली. देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरूवातीला कोणाला दिली जाणार याचा प्राधान्यक्रम सरकारनं तयार केला आहे. सुरूवातील ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील व्यक्तींना आणि त्या पश्चात त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना ज्यांना कोणता गंभीर आजार आहे त्यांना ही लस दिली जाईल. देशात अशा लोकांची संख्या ही २७ कोटींच्या जवळपास आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी राज्यांच्या तयारीचा आढावाही घेतला. या बैठकीला कॅबिनेट सचिव, प्रधान सचिव, आरोग्य सचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ज्या लोकांना लस दिली जाणार आहे, त्यांना सत्राचे वाटप, पडताळणी आणि लसीकरणानंतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी डिजिटल व्यासपीठाची मदत मिळेल, असेही सरकारने म्हटले आहे. बैठकीत पंतप्रधानांनी देशभरातील कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच यादरम्यान त्यांनी Co-WIN वॅक्सिन डिलिव्हरी मॅनेजमेंट सिस्टमच्या बाबतही माहिती घेतली. हा एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे कोरोा लसीकरणावर रिअल टाईम लक्ष ठेवणं, लसीच्या साठ्याबाबातच्या सूचना, ते साठवण्यासाठी लागणारं तापमा आणि ज्यांना लस द्यायची आहे त्यांना ट्रॅक करण्याचं काम होणार आहे. आतापर्यंत ७९ लाखांपेक्षा अधिक लोकांनी यावर रजिस्टर केलं आहे.