चोपडा (प्रतिनिधी) शहरातील चोपडा शिरपूर बायपास रस्त्यावर असलेल्या वास्तू मार्बल दुकानाचे शटर वाकवून दुकानातील ५०हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबविल्याने व्यापारी वर्ग कमालीचा धास्तावला आहे.
मोठ मोठ्या चोऱ्या होऊनही आणि तिसऱ्या डोळ्यात म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही चोरटे बिनधास्त हात मारत आहे. वास्तू मार्बल दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानातील टेक्स्मो कंपनीची पाण्याची मोटार ५ हजार रुपये किंमतीची,जुने वापरते मायक्रोटेक कंपनीचे इन्व्हर्टर, बॅटरी,२५ हजार रुपये किंमतीची, सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर,एलइडी टीव्ही २०हजार रुपये किंमतीचे, आणि २ हजार रुपये किंमतीची गॅस सिलिंडर असा एकुण ५२ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याने व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत दुकान मालक बाबुलाल हिरालाल कुमावत यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली आहे.