अहमदनगर (वृत्तसंस्था) राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगरच्या पुढे घोडेगाव जवळ हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाड्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
राज ठाकरेंच्या ताफ्यातील मागील बाजूस असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याचं समजत आहे. यामध्ये अभिनेते केदार शिंदे, आणि अंकुश चौधरी यांच्या गाडीचा बोनटचे नुकसान झाल्याची माहिती आहे. अहमदनगरच्या पुढे घोडेगाव नजीक गाड्या धडकल्या आहेत. दरम्यान, या अपघाताबद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही आहे. औरंगाबादेत राज ठाकरे यांनी १ मी रोजी (रविवारी) सभ होणार आहे. ते आज पुण्यातून औरंगाबादसाठी निघाले होते. या प्रवासादरम्यान राज ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागतही केलं जात आहे. यामध्येच आता अहमदनगर पुढील घोडेगाव नजीक हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर आता पुन्हा राज ठाकरे यांचा ताफा संपूर्ण ताफा मार्गस्थ झाला असून किमान ४० ते ४५ मिनिटात औरंगाबादला पोहचेल, अशी माहिती मिळत आहे.