मेहुणबारे ता, चाळीसगाव (प्रतिनिधी) एरंडोल येवला महामार्गावर बहाळनजीक समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार मामा- भाचा जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. या घटनेने भऊर गावावर शोककळा पसरली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, आकाश भिवसन मोरे (वय १८) व अनिल संजय गायकवाड (वय १९, रा. भऊर ता. चाळीसगाव) अशी या मृत मामा भाच्याची नावे आहेत तर विनोद विक्रम मोरे (वय १९) हा जखमी झाला आहे. हे तीनही जण भऊर येथून कामानिमित्त चाळीसगावला येथे गेले होते. तिथून परतत असताना बहाळ गावानजीक समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला धडक दिली. यात आकाश व अनिल हे दोन जागीच ठार झाले तर विनोद हा जखमी झाला. अधिक तपास पोलिस करत आहेत.
















