पुणे (वृत्तसंस्था) संपूर्ण जगात लक्ष लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यात येणार आहेत. पंतप्रधानांच्या बाबतची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली असून त्या त्यादृष्टीने प्रशासनाकडून सध्या पंतप्रधानांच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली जात आहे. तर कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च केंद्र सरकार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लस निर्मिती क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सिरममध्ये सध्या कोरोनावरील लशीची निर्मिती सुरू आहे. त्याचा आढावा पंतप्रधान घेणार आहेत. जिल्हा प्रशासन तसेच सिरमकडून या दौऱ्याची तयारी सुरू आहे. जगभरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. भारतातही दिल्ली, केरळमध्येही कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. त्यामुळे कोरोनाची लस केव्हा येणार याकडे कोट्यावधी भारतीयांसह जगभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यादृष्टीने सिरम इन्स्टिट्यूट मध्ये कोरोना लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यावर विविध देशांचे लक्ष लागलेले आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला शनिवारी भेट देणार आहेत. शनिवारी दुपारी एक ते दोन या वेळेत त्यांचा नियोजित दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते सिरमला भेट देऊन करून वरील लसीचा आढावा घेऊन तेथील वैज्ञानिक डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, कोरोना लस सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी १०० देशांचे राजदूतही ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट देणार आहेत. राजदूतांचा दौरा २८ नोव्हेंबरला नियोजित करण्यात आला होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे तारखेत बदल करण्यात आला आहे. राजदूत हे चार डिसेंबरला येणार आहेत.‘पंतप्रधान मोदी हे २८ नोव्हेंबरला, तर राजदूत हे चार डिसेंबरला येणार असल्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.