जामनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांवर महाविकास आघाडीने जो अन्याय वीजजोडणीच्या माध्यमातून केलेला आहे. तो थांबवावा व शेतकऱ्याला पुन्हा महावितरण कंपनीकडून शेतीसाठी वीज जोडणी पूर्ववत करून द्यावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात कोरोना प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह दहा जणांविरूद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पोना सुनील अर्जुन माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ जानेवारी २०२२ रोजी श्रीमंत बाबाजी राघो मंगल कार्यालय ते तहसील कार्यालय याठिकाणी आमदार गिरीश दत्तात्रय महाजन, चंद्रकांत रामधन बाविस्कर, तुकाराम विठोबा निकम, गोविंद मुरलीधर अग्रवाल, बाबुराव केशव घोंगडे, रवींद्र रमेश झाल्टे, शरद मोतीराम पाटील, महेंद्र कृपाराम बाविस्कर, नामदेव माणिकचंद मंगरुळे, शेख आणि शेख बिस्मिल्ला, शेख नदीम शेख यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडील कोरोना प्रतिबंधित आदेश लागू असताना देखील शेतकरी यांचेवर महाविकासआघाडीने जो अन्याय वीज तोडणीच्या माध्यमातून केलेला आहे. तो थांबावावा शेतकरी पुन्हा महावितरण कंपनीकडून शेतीसाठी वीज जोडणी पूर्ववत करून द्यावी, या मागणी का मी तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन भारतीय जनता पार्टी तालुका पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात प्रमुख पदाधिकारी व इतर शेतकरी, कार्यकर्ते एकत्र येऊन मोर्चात सहभागी होऊन मोर्चा काढला. त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून कायदेशीर फिर्याद आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रियाज गयास शेख करीत आहेत.