TheClearNews.Com
Saturday, November 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी २६ मार्चला जिल्हा काँग्रेस भवन परिसरात उपोषण

The Clear News Desk by The Clear News Desk
March 25, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात तसेच महागाईच्या मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला असून पक्षाच्यावतीने याच दिवशी दि. २६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जळगाव जिल्हा काँग्रेस भवन आवारात कोरोनाचे नियम पाळून उपोषण करून पाठिंबा देण्यात येणार आहे.

तसेच सर्व ब्लॉक अध्यक्ष या भारत बंद ला पाठिंबा देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमांवर मागील १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. मोदी सरकारने सुरुवातीला चर्चेचा देखावा केला, पण हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मात्र मान्य केली नाही. हे तीन काळे कायदे शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्धवस्त करणारे आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बड्या भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचा सरकारचा डाव आहे. या कायद्यामुळे शेतीमालाला मिळणारा हमीभाव आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असून खाजगी व्यापारी व उद्योजकांना शेतकऱ्यांची खुली लूट करण्याची मुभा मिळणार आहे. या जुलमी कायद्यांच्या विरोधात देशातील तमाम शेतकरी पेटून उठले आहेत.

READ ALSO

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

सुरुवातीपासूनच काँग्रेसचा या आंदोलनाला पाठिंबा राहिलेला असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर आंदोलने करण्यात आली. तसेच खासदार राहुल गांधी यांनीही पंजाब, हरियाणासह इतर राज्यात ट्रॅक्टर रॅली काढून शेतकरी आंदोलनात सक्रीय सहभाग दर्शवला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे. ६० (साठ) लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देऊन कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. १०० पेक्षा जास्त दिवस लोटले तरी केंद्रातील कुंभकर्णी सरकारला जाग आलेली नाही.

तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढवले आहेत. इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनता व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. मात्र हिटलरशाही वृत्तीचे मोदी सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी २६ रोजी जिल्हा काँग्रेस भवन परिसरात उपोषण केले जाणार असून जिल्ह्यातील प्रमुख नेते व आजी, माजी आमदार खासदार, पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत जिल्हामुख्यालयी उपोषणास उपस्थित राहावे. तसेच ब्लॉक अध्यक्षांनी या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुटूंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांची ‘दिवाळी’

November 13, 2026
अमळनेर

“दिवाळी पाडवा” निमित्ताने सफाई कामगार/ गरजूंना दिवाळी फराळ व गरीब होतकरू “मुलींना सायकल वाटप”

November 13, 2026
गुन्हे

मद्यासाठी मुलाने आईचा गळा चिरुन केली हत्या

November 13, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेस सकारात्मक सुरुवात पहिल्या दोन दिवसातच १२ ग्राहकांनी घेतला लाभ

November 13, 2026
अमळनेर

अमळनेरातील सुखांजनी हॉस्पिटल येथे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..!

November 12, 2026
अमळनेर

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

November 11, 2026
Next Post

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ९२ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता पवारला सुवर्णपदक

December 7, 2025

जगण्याची आशा संपली अन् एकमेकांच्या कवेत घेतला निरोप

October 26, 2022

पत्रकार, नेते आणि सेलिब्रिटींची खिल्ली उडवणे पडणार महागात ; फेसबुकने पॉलिसी केली अपडेट

October 14, 2021

श्रीराम मंदिर निधीसाठी सतपंथ संप्रदाय प्रेरणापीठाने दिला एक कोटीचा धनादेश !

February 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group