नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संकटमय काळात जीवनावश्यक गरजा आणि दळण-वळण नियमिततेने सुरु राहण्यासाठी केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरु केली. या रेल्वेच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावरील प्रत्येक शेतकऱ्याला मेट्रो सिटीज मध्ये स्वतःचे पीक विकण्याची संधी मिळाली. केंद्र सरकारच्या या किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद व वाढलेली मागणीचा आढावा पाहता दररोज रावेर ते न्यू अझादपूर किसान रेल्वेची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अथवा व्हीपीयु रॅक तरी रावेर ते न्यू अझादपूर दररोज उपलबध व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी दिल्ली लोकसभेत आपल्या निवेदनाच्या माध्यमातून केली.
किसान रेल्वे ही जीवनावश्यक घटकांच्या दळण-वळण हेतू केंद्र सरकारने सुरु केली. रेल्वे मंत्रालयाने संपूर्ण देशभरात जवळपास २०० पेक्षा जास्त किसान रेल्वे कोरोनच्या काळात सुरु केल्या. या रेल्वेच्या माध्यमातून भाजी, फळ, अन्नधान्याचे छोटे पार्सल मोट्रोसिटीज मध्ये थेट पाठविता येण्याची सुविधा ग्रामीण भागातील उत्पादकांना निर्माण झाली. कोरोना काळाच्या या रेल्वेच्या माध्यमातून मोठमोठ्या शहरात ग्रामीण भागातून जीवनावश्यक वस्तूंची आयात निर्यात सुरळीतपणे सुरु झाली. केंद्राच्या या योजनेला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा दर्जात्मक मालाला मोठ्या शहरात जास्त मागणी होऊ लागली आहे. शेतकऱ्यांना मिळालेल्या या उत्पादन संधीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांचा माल मोठमोठ्या शहरात दररोज आयात निर्यात करण्यासंबंधीच्या मागणीसाठी किसान रेल्वे अथवा सवलतीच्या शुल्क दारात व्हीपीयु रॅक रावेर ते न्यू अझादपूर (दिल्ली)साठी उपलब्ध करून देण्याचे शेतकऱ्यांमार्फत निवेदन खासदारांनी लोकसभेत केले. किसान रेल्वेच्या सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणावर छोट्या शेतकऱ्यांना होतो आहे. किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांची दर्जेदार केळी फळपीक सहजतेने मोठ्या शहरात उपलब्ध करण्यासाठी मदत होईल. छोट्या शेतकऱ्यांच्या उत्पनात किसान रेल्वेच्या माध्यमातून वाढ होऊन त्यांच्या उत्पादनाची मागणीही मेट्रो सिटीज मध्ये वाढलेली आहे. त्यामुळे सवलतीच्या दरात लवकरात लवकर व्हीपीयु रॅक उपलब्ध करण्याबाबत संबंधित झोनल अधिकाऱ्यांनाही निर्देश देण्यात यावेत असे निवेदन लोकसभेत खासदार रक्षाताई खडसे यांनी केले.