अमरावती (वृत्तसंस्था) वरुड तालुक्यातील झुंज येथील तीर्थ येथे वर्धा नदीत बोट उलटून ११ जण बुडाले यापैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले होते. अन्य १० मृतदेह शोधण्याचे काम बचाव पथकाकडून सुरू होते. आज पहाटेपासून पुन्हा बचाव कार्य सुरू झाले. तब्बल ४५ तासानंतर आज एकूण ७ मृतदेह हाती लागले. त्यामुळे आतापर्यंत ११ पैकी एकूण १० जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित एकाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
वर्धा नदीत १४ सप्टेंबर रोजी पर्यटनास गेलेल्या १३ जणांची बोट उलटली. यातील ११ जण पाण्यात बुडाले. त्यापैकी १० जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडले. घटनेदिवशीच यातील दोघेजण बचावले आहेत. श्याम मनोहर मटरे (वय २५ वर्षे) आणि राजकुमार रामदास उईके (वय ४५ वर्षे) हे दोघे बचावले आहेत. त्यांना पोहायला येत असल्याने ते सुखरुप बाहेर आले.
दुर्घटनेच्या दिवशी सापडले तिघांचे मृतदेह
१) नारायण मटरे (वय ४५ वर्षे. रा.गाडेगाव)
२) किरण विजय खंडाळे (वय २८ वर्षे. रा. लोणी)
३) वंशिका प्रदीप शिवनकर (वय २ वर्षे. रा. तिवसाघाट)
आज सापडलेले मृतदेह
१) निशा नारायण मटरे (वय २२ वर्षे)
२) पियुष तुळशीदास मटरे (वय ८ वर्षे)
३) अतुल गणेश वाघमारे (वय २५ वर्षे)
४) वृषाली अतुल वाघमारे (वय २० वर्षे)
5) अश्विनी अमर खंडाळेस (वय २१ वर्षे)
6) रूपाली वाघमारे
सातवा मृतदेह सापडल्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.