फैजपूर (प्रतिनिधी) फैजपूर येथील युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी वसीम तडवी तर यावल तालुका सरचिटणीसपदी अजय मेढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकतेच डी एन काँलेज मध्ये युवक काग्रेसचा मेळावा घेण्यात आला. आमदार शिरीष दादा चौधरी व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील तसेच धनंजय शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे शहर अध्यक्षपदी वसीम मेहबूब तडवी तर यावल तालुका सरचिटणीसपदी अजय मेढे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी यावल रावेर विधानसभा अध्यक्ष वसीम जनाब तसेच यावल रावेर विधानसभा कार्याध्यक्ष मुदस्सर जनाब, जावेद जनाब मारूल, फैजपूर शहर अध्यक्ष रियाज भाई, नगरसेवक मोहसीन खान, जिल्हा सरचिटणीस रामाराव मोरे, जिल्हा सचिव बबन तायडे व मान्यवर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन व स्वागत केले.