चोपडा (प्रतिनिधी) — संतधार पावसाने मागील महिन्या भरापासून उघडीप झालीच नाही पावसाने कहरच केला आहे. मात्र चोपडा तालुक्यातील माचाला येथे पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत.
सविस्तर असे की, मागील महिन्या भरा पासून सतत संतधार पाऊस सुरू आहे.शेतात ,गावात पावसाचा कहरच झाले आहे. मात्र ह्या महिन्या भरात वीज वितरण कंपनीचा लपंडाव सुरू आहे .विजेचा लपंडाव नेहमी सुरू असल्याने मुबलक पाणी असून देखील पाण्याच्या टाकीत पाणीच भरले जात नाही त्यामुळे नळा पाणी येतच नाही. त्यामुळे पाणी टंचाई होत आहे. वीज पुरवठा सलग दोन तास सुध्दा राहत नसल्याने पाणी पाण्याच्या टाकीत भरलेच जात नसल्याने नळाला पाणी येत नसल्याने लांबून पाणी आणावे लागत आहे. अनेक कुटुंबातील लोक पाण्यासाठी पायपीट करतांना दिसत आहे. भर उन्हाळ्यात सुध्दा माचाला या गावी पाणी टंचाई झाली नाही परंतु भर पावसात विजेचा लपंडावाने पाणी टंचाई होत आहे. त्यामुळे तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे. वीज वितरण कंपनीला अनेक वेळा तक्रार देऊनही वीज पुरवठा सुरळीत करत नाही आणि त्यामुळेच ही परिस्थिती माचल्या वासियावर आली आहे.तरी याबाबत वरिष्ठांनी लक्ष द्यायला हवे. अशी मागणी माजी उपसरपंच नितीन पाटील यांनी केले आहे.