कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील रहिवासी वजीरा बी मुसा पठाण उर्फ वजीरा खाला यांना दि. ९ मे रोजी ‘मदर्स डे’ या दिवशी त्यांना ‘माँ तुझे सलाम’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील बेटी एक लक्ष फाऊंडेशन च्यावतीने पुरस्कार देऊन सन्मनीत करण्यात आले.
वजीरा खाला ह्या डिलिव्हरी करण्यात खूपच तज्ज्ञ व प्रख्यात आहेत. त्यांनी आतापर्यंत २० हजार नॉर्मल डिलिव्हरी केल्या आहेत. यापूर्वी डिलिव्हरी करण्याचे म्हटले की, डिलिव्हरीसाठी दायन (सुईण बाई) बोलून घरीच डिलीव्हरी करत होते. एक्स-रे ची सोय नाही. अशा बिकट परिस्थितीत वजीरा खाला डिलिव्हरी करीत होत्या. त्यांनी कोणताही कोर्स केलेला नाही. त्यांच्या वडिलांना आयुर्वेदाचे उत्तम ज्ञान होते. त्यांच्या वारसा म्हणून खाला काम करीत आहे. डिलिव्हरी करताना बाळ डोक्याकडून आहे की, पायाकडून तसेच जुडवा आहे की नाही याचे उत्तम ज्ञान त्यांना आहे. एखाद्या वेळेस धुळे जिल्ह्यातून बाहेरगावी जाण्याची वेळ आली तर रात्री-बेरात्री ते गाडीवर बसून जातात. दवाखान्यात डॉक्टरांनी जर बिल काढले तर वजीरा खाला पेशंटची शिफारस करतात. डॉक्टर हमखास बिल कमी करून टाकतात . पूर्वी मोठे हॉस्पिटल नव्हते. डॉक्टरांना काही अडचणी भासल्यास स्वतः वजीरा खालाला बोलवून त्यांचे सहकार्य घेत होते. अशा महान कार्य करणाऱ्या खालाना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात दिल्ली येथील बेटी एक लक्ष फाउंडेशन च्यावतीने ‘माँ तुझे सलाम’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.