मुंबई (वृत्तसंस्था) समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांना क्रांती रेडकर यांनी उत्तर दिलं आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. मला, मुलांना, कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही क्रांती रेडकर यांनी केलाय.
समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. पुरावे असतील तर कोर्टात जावं. असा टोला क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना लगावला. समीर वानखेडे यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत. समीर वानखेडे सत्याच्या मार्गानं काम करतात, ते अनेकांना खटकतं. पुरावे असतील तर कार्टात जावं. ट्विटरवर लिहून काय होणार. या प्रकरणातून समीर वानखेडे बाहेर पडतील. नेहमी सत्याचा विजय होतो. तेव्हा मला त्याची काहीही काळजी वाटत नाही. समीर हे निर्दोष आहेत, असे रेडकर म्हणाल्या. नवाब मलिक यांना वेळच उत्तर देईल, असेही त्या म्हणाल्या. आम्हाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. आपत्तीजनक भाषेत वक्तव्ये केली जात आहेत. सुरक्षा असतानाही आम्हाला मारण्याची धमकीही दिली जात आहे. या सगळ्याचा मानसिक त्रास होत आहे. मराठी असल्याचा अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्रात मला कुणीतरी धमकी देतेय, याची भिती वाटते. आम्हाला ट्रोल केलं जातेय. मारण्याच्या धमक्या दिल्या जातायेत. लटकून टाकतील, जाळून टाकतील, अशा धमक्या येतात, असे रेडकर म्हणाल्या.
















