मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदेंच्या बंडाची कुणकुण काँग्रेस, राष्ट्रवादीला लागली होती. त्यांनी याची कल्पना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंना दिली. यानंतर ठाकरेंनी शिंदेंना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतलं. दोन्ही नेत्यांमध्ये याच विषयी संवाद सुरू होता. तेव्हा उद्धवजी, मी कसं काय बंड करेन? तुम्ही इतकी मोठी गोष्ट कशी काय बोलता?, असे प्रश्न शिंदेंनी विचारले. मी तुमच्या कुटुंबासाठी जीवदेखील देऊ शकतो, असं शिंदे पुढे म्हणाले.
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातचविरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर मोठं संकट निर्माण झालं असून महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाची कुणकुण काँग्रेस, राष्ट्रवादीला लागली होती. काही दिवसांपूर्वी ही खबर मुख्यमंत्री ठाकरेंना देण्यात आली, ठाकरेंनी शिंदेंना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतलं. संवाद सुरू झाला त्यावेळी शिंदे म्हणाले, उद्धवजी, मी कसं काय बंड करेन? तुम्ही इतकी मोठी गोष्ट कशी काय बोलात?, असे प्रश्न शिंदेंनी विचारले. त्यावेळी शिंदेंच्या डोळ्यात अश्रू होते. मी असं काही करणार नाही. मी तुमच्या कुटुंबासाठी जीवदेखील देऊ शकतो, असं शिंदे पुढे म्हणाले. ठाकरे भावुक झाले आणि त्यांनी विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी शिंदेंकडे सोपवली.
आमदारांच्या नाराजीची सुरुवात राष्ट्रवादीकडे अर्थ आणि गृह मंत्रालय गेल्यापासूनच झाल्याचं वानखेडेंनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० पेक्षा अधिक आमदार आहे. इतक्या मोठ्या संख्येनं आमदारांना जबरदस्तीनं नेलं जाऊ शकत नाही, असं वानखेडे म्हणाले. शिवसेनेच्या अनेक आमदारांना निधी मिळत नसल्याने ते नाराज असल्याचे देखील वानखेडे यांनी सांगितले आहे. निधी मिळत नसल्याची तक्रार अनेक आमदार मुख्यमंत्री ठाकरेंकडे केल्या होत्या. त्यावर मी शरद पवारांशी बोलतो, असं उत्तर मुख्यमंत्री द्यायचे.