जळगाव (प्रतिनिधी) हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे अशा शायराना अंदाजात राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. ते जळगावात एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना बोलत होते.
हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, काय राहिलं आता आयुष्यात सत्तराव्या वर्षी. कशासाठी? कशासाठी हे लोकं बदनामी करत आहेत, असा सवाल खडसे यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी ईडीचा विषय पुन्हा एकदा छेडला. आता ईडीचा विषय संपला आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. आता प्रकरण कोर्टात आहे. मी फक्त कोर्टाला घाबरतो, असं त्यांनी सांगितलं. काहीही एक संबंध नसताना माझ्या जावयाला यांनी आत टाकले. आज मी ज्या पक्षांमध्ये आहे तो पक्ष राष्ट्रवादी माझ्या पाठीमागे खंबीर पणे उभा आहे, असंही ते म्हणाले.