पुणे (वृत्तसंस्था) देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद असून ज्यावेळी आम्हाला लस दिली जाईल, तेव्हा निश्चित घेतली जाईल. पण प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की मी लस घेणार नाही आणि आम्ही त्यांना अजिबात देणार नाही.” असं विधान केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आज (रविवार) पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना केलं. तसेच, लसीला विरोध करणाऱ्यांनीच आग लावली आहे का? नेमकं काय झालेलं आहे? या प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे, असं देखील आठवले यांनी यावेळी बोलून दाखवलं.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, “ज्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लस तयार करण्यात आली. तिथे दोन दिवसांपूर्वी आग लागली. त्या घटनेत जवळपास हजार कोटींचं नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीला केंद्र सरकारकडून कशा प्रकारे मदत मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर त्या आगीच्या घटनेत निष्पाप पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कंपनीकडून २५ लाखांची मदत देखील जाहीर झाली आहे. पण आता कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना तिथे नोकरी द्यावी, अशी मागणी मी पूनावाला यांच्याकडे करणार आहे.” तसेच, लसीला विरोध करणाऱ्यांनीच आग लावली आहे का? नेमकं काय झालेलं आहे? या प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे, मी घटनास्थळाकडे चालेलो आहे. असं देखील आठवले यांनी यावेळी बोलून दाखवलं.
राज्यात आता अनेकांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली आहेत, असंच काहीसं चित्र दिसू लागलं आहे. कारण ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ओबीसी समाजाचे अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी आता मुख्यमंत्री ओबीसीचाच असे बॅनर झळकावले आणि घोषणाही दिल्या. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी जशी ओबीसींची आहे, तशीच ती दलितांचीही आहे. पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे ते होणार नाही, असंही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी बोलून दाखवलं.
















