TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक भविष्य १२ ते १८ जून २०२३ !

जाणून घ्या मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य भाकीत !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : ऊन-सावलीप्रमाणे हा ग्रहांचा खेळ चालूच राहणार आहे. चढ-उतार स्वीकारून पुढे चला. त्यामुळे त्रास होणार नाही. अमावास्या कालावधी चांगला जाईल. प्रयत्न सोडू नका. व्यवसायात धरसोड वृत्ती टाळा. नोकरदार वर्गाने कमी बोललेले चांगले, खर्च कमी करा. दिनांक ११, १२ हे संपूर्ण दिवस व १३ तारखेला दुपापर्यंत हा अडीच दिवसांच्या या कालावधीत कोणतेही घेतलेले निर्णय नुकसानीचे ठरू शकतात. या अडीच दिवसांचा कालावधी फारसा चांगला नाही तर यात शांत बसणे हाच पर्याय असेल. बाकी दिवस चांगले असतील.

वृषभ : या सप्ताहात भावनिक गोष्टींचा विचार टाळा. अमावास्या तुमच्या राशीतूनच होत आहे. या दिवशी जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती करू नका. बाकी दिवस चांगले जातील. व्यवसायातील स्थिती चांगली असेल. खर्च जपून करा. कुटुंबाची साथ मिळेल. शारीरिकदृष्टय़ा योगसाधनेला महत्त्व द्या. १३ तारखेला दुपारनंतर १४ व १५ संपूर्ण दिवस काही कारण नसतानासुद्धा दुसऱ्याचे ऐकून मनाला हुरहुर लागेल. एखाद्याने आपल्याविषयी वाईट बोलल्यामुळे मनस्ताप वाढू शकतो; पण त्याचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. कारण हे दिवस आपल्याला चांगले नाहीत हे विसरून चालणार नाही.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : व्यावसायिकदृष्टय़ा पळापळ झाली तरी ती फायद्याची असणार आहे. नोकरदार वर्गाला कामाच्या व्यापात इतर गोष्टीत लक्ष घालणे जमणार नाही. वायफळ खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात मध्यस्थी करणे टाळा. मुलांना तुम्हाला न जमणाऱ्या गोष्टींसाठी आश्वासन देऊ नका. घरामध्ये आतापर्यंत ज्या गोष्टीला विरोध होत होता किंवा पाठिंबा मिळत नव्हता तो मिळेल. दिनांक १६, १७ हे दोन दिवस विचारपूर्वक निर्णय घ्या. इतरांमार्फत आलेले प्रस्ताव या दोन दिवसांत स्वीकारू नका. त्यासाठी वेळ द्या. स्पष्ट बोलल्यामुळे वादविवाद वाढू शकतात. त्यामुळे दोन शब्द कमी बोलून वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा.

कर्क : या सप्ताहात मनासारख्या गोष्टी घडायला आता वेळ लागणार नाही. जे तुम्ही ठरवले आहे ते होणारच आहे. आपल्याकडून एखादी गोष्ट होईल का नाही याची जी चिंता वाटत होती ती आता वाटणार नाही. अनेक मार्गातून आलेले प्रस्ताव स्वीकारा. ते आगामी काळासाठी चांगले असतील. कामामधील उत्साह टिकून राहील. व्यावसायिकदृष्टय़ा उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या शाबासकीची पोचपावती मिळेल. आर्थिक भरभराट होईल. मानसिक समाधान लाभेल. एकूणच सप्ताह भाग्योदयाचा असेल. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : व्यवसायात पर्यायी व्यवस्था म्हणून बदल स्वीकारा. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिकदृष्टय़ा बचत करा. सार्वजनिक ठिकाणी सहभाग टाळा. नातेवाईकांशी संवाद जपून करा. दिनांक ११, १२ हे संपूर्ण दिवस १३ तारखेला दुपापर्यंत असा कालावधी कितीही शांत राहायचे ठरवले तरीसुद्धा समोरून अशा काही गोष्टी येतील की रागावर नियंत्रण राहणार नाही. अशा वेळी एक लक्षात ठेवा. हा राग इतरांपेक्षासुद्धा स्वत:साठी नुकसानीचा ठरेल. जी गोष्ट आपल्याला आधी कळलेली आहे तर त्यावर विचार करून संयम ठेवणे सर्वात चांगले राहील.

कन्या : व्यावसायिकदृष्टय़ा आवकजावक पाहून मगच गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाने कोणावर अवलंबून राहू नका. आर्थिक बाबतीत व्यवहार करताना हुशारीने वागा. समाजमाध्यमांचा वापर जेवढय़ास तेवढा करा. १३ तारखेला दुपारनंतर १४, १५ संपूर्ण दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी जेमतेम राहील. या कालावधीत सहनशीलता वाढवावी लागेल. स्पष्ट बोलल्याने समोरच्याची मने दुखावली जाणार आहेत. त्यामुळे दुरावा येण्याची शक्यता दाट आहे. एक घाव दोन तुकडे करण्याची ही वेळ नाही. तेव्हा शांतपणाने हे दिवस पुढे ढकला.

तूळ : या सप्ताहात आपली बाजू सत्य जरी असली तरी ती इतरांना सत्य वाटणारी नसणार आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गाने सर्व गोष्टी हाताळाव्यात. स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिका. आडवळणी मार्ग स्वीकारण्यापेक्षा सरळ मार्ग स्वीकारा. या कालावधीत स्वत:वर नियंत्रण ठेवून मर्यादा सांभाळा. अमावास्या कालावधीत वादविवाद टाळा. व्यवसायात जे चालले आहे ते ठीक आहे असे समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कोणाशी हुज्जत घालत बसू नका. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. जोडीदाराचा आदर करा.

वृश्चिक : एखाद्या गोष्टीत आपण स्वत:हून तडजोड स्वीकारा. ती चांगली राहील. अमावास्या कालावधीत महत्त्वाचे निर्णय टाळा. बाकी दिवस चांगले राहतील. व्यवसायात प्रसिद्धी मिळावी म्हणून काम करण्यापेक्षा फायद्याचे गणित चुकणार नाही हे पहिले पाहा. नोकरदार वर्गाने कामात घाईची कृती टाळा. वायफळ खर्च टाळा. १३ तारखेला दुपारनंतर १४, १५ हे संपूर्ण दिवस अस्वस्थता जाणवेल. मागील गोष्टींवर चर्चा करून विनाकारण मनस्ताप वाढवून घेऊ नका. राग आला म्हणून बोलले गेले असे करून चालणार नाही. एकदा तोंडातून गेलेला शब्द परत येणार नाही. त्यामुळे तोंडावर ताबा ठेवा.

धनू : व्यवसायात मागील थकबाकी जमा करून घेताना गिऱ्हाईकांशी गोडीचा संवाद साधा. नोकरदार वर्गाचे काम वेळेत पूर्ण होईल. खर्च आटोक्यात ठेवा. राजकीय क्षेत्रात प्रलंबित कामांना गती मिळेल. घरगुती वातावरण ठीक राहील. दिनांक १६, १७ हे दोन दिवस रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे करत बसलात तर त्याचा त्रास इतरांपेक्षा तुम्हालाच होईल. झाल्या- गेलेल्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा. त्यातून काही चांगले सिद्ध होणार नाही. उलट तुमच्याच अंगलट गोष्टी येऊ शकतात. तुम्हाला न जमणाऱ्या गोष्टी दुसऱ्यांवर लादू नका. बाकी दिवसांचा कालावधी ठीक राहील.

मकर : या सप्ताहात नकारार्थी विचार बाजूला केले तरच दिवस चांगले जाणार आहेत. चांगल्या ग्रहांची साथ असते. या वेळी कुठे आपण कमी न पडता कामाला लागणे योग्य राहील. तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही निश्चितपणे ठरवा. त्यासाठी कोणा तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावयाचे असल्यास हरकत नाही. मार्ग नक्कीच मिळेल. अमावास्या कालावधी ठीक राहील. व्यवसायात आखलेली रूपरेखा अगदी बरोबर असेल. नोकरदार वर्गाचे वर्चस्व वाढेल. आर्थिकदृष्टय़ा समाधानी वृत्ती राहील. समाजसेवा करताना सामंजस्याने वागा. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.

कुंभ : सप्ताहातील सर्व दिवसांचा कालावधी चांगला असल्यामुळे कामात अडथळे येणार नाहीत. अमावास्या कालावधीही चांगला जाईल. व्यवसायात मागील दिवसांपेक्षा सध्याचे दिवस चांगले असतील. नोकरदार वर्गाला दुहेरी लाभ मिळेल. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. राजकीय क्षेत्रात व्यक्तिमत्त्व खुलेल. शुभ ग्रहांचे भ्रमण अनुकूल असेल. आतापर्यंत महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होत नव्हते ते आता शक्य होणार आहेत. प्रत्येक कामामध्ये आघाडी मिळवू शकाल. काम करताना जे दडपण येत होते ते दडपण दूर होईल. त्यामुळे कामातील उत्साह टिकून राहील.

मीन : या सप्ताहात सर्वच दिवसांचा कालावधी अनुकूल असेल. प्रत्येक दिवस चांगला जावा असे वाटत असते. तसाच हा सप्ताह आहे. तेव्हा चांगल्या गोष्टींसाठी उशीर करू नका. प्रयत्नांना फळ मिळणार आहे. आपले मत इतरांनी ऐकून घ्यावे असे मत तुमचे दर वेळी असते आणि सध्या ते पूर्ण होणार आहे. इतरांनी आपले मत ऐकून घेतल्यानंतर व त्यावर योग्य असे मार्गदर्शन मिळाल्यामुळे तुम्हाला त्याचा आनंद होईल. व्यवसायात प्रगती होईल. मोठी गुंतवणूक करणे अवघड वाटणार नाही. नोकरदार वर्गाला कामाचा आढावा घेताना भावनिक गोष्टींचा विचार करून चालणार नाही. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

कूलरचा शॉक लागून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू ; दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात धावत्या रेल्वेत चढणे तरुणाला पडले महागात ; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

January 11, 2021

वाघाच्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला ठार !

January 8, 2024

पालिका निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार ; प्रारूप रचनेचा आराखडा तयार करण्यास वेग !

September 16, 2021

जळगावात महिलेच्या गळ्यातून सोनपोत लंपास !

October 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group