मेष : स्वत: स्वत:चा त्रास वाढवून घेऊ नका, शांतपणे काम करा. महाशिवरात्रीचा दिवस व्यस्त राहील. व्यावसायिक परिस्थितीत चांगले बदल होतील. मनासारख्या गोष्टी घडू लागतील. नोकरदार वर्गाच्या कामात चढउतार राहील. आर्थिकदृष्टय़ा अनपेक्षित लाभ होईल. दिनांक १४, १५ हे दोन दिवस असे आहेत की इतरांकडून अपेक्षा ठेवणे त्रासाचे ठरेल. या दोन दिवसांत आपले काम आपण स्वत:च करणे इष्ट राहील. हे काम करत असताना चिडचिड होणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ : सर्व दिवसांचा कालावधी हा जपून हाताळावा लागेल. कोणावर जबरदस्ती करायला जाऊ नका. आळशी वृत्ती बाजूला ठेवा. एखादी गोष्ट नाही पटली म्हणून पटकन बोलायला जाऊ नका. शांत राहणे उत्तम राहील. व्यवसायातील धाडसी निर्णय टाळा. नवीन गुंतवणूक करणे त्रासाचे राहील. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहिलेले चांगले. कोणाला हात उसनवारी पैसे द्यायला जाऊ नका. राजकीय क्षेत्रापासून लांब राहा.
मिथुन : विनाकारण परिश्रम वाढवण्यापेक्षा नियोजन करा. चांगल्या प्रस्तावासाठी वाट बघावी लागेल. कोणाच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. कोणताही निर्णय घेताना घाईची कृती टाळा. महाशिवरात्रीचा दिवशी स्वत:ला कामात गुंतवून घ्या. स्वत:च्या व्यवसायाची जबाबदारी कोणावर टाकू नका. वनस्पतीजन्य मालाची साठवणूक मोठय़ा प्रमाणात करणे टाळा. नोकरदार वर्गाला कामात मदत घ्यावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. सध्या सर्वच दिवस चांगले कसे जातील या दृष्टीने प्रयत्न करा. चंद्रग्रहाचे भ्रमण फलदायी नाही असेच म्हणावे लागेल. काहीही नियोजन नसताना कोणतेही काम करू नका. नाहीतर त्याचा त्रास वाढू शकतो.
कर्क : महाशिवरात्रीनिमित्त केलेला संकल्प पूर्ण होईल. व्यावसायिक प्रगती होईल. स्पर्धात्मक गोष्टीत यश मिळेल. भागीदारी व्यवसायात नवीन घडामोडी करण्याचा प्रारंभ होईल.नोकरदार वर्गाच्या कामकाजात वाढ होईल. खर्च कमी करा. सार्वजनिक ठिकाणी निर्णय घेताना द्विधावस्था होईल. मित्रांमार्फत आलेले प्रस्ताव न स्वीकारलेले चांगले. दिनांक १६, १७ रोजी वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. प्रत्येक दिवस सारखाच असतो असे नाही. त्यात चढउतार राहतो, हे मात्र विसरू नका. एखादी गोष्ट नाही पटली तर तिथेच अडून बसू नका. स्वत:मध्ये बदल करून पुढे चला.
सिंह : स्वत:च्या हिमतीवर बरेच काही करू शकाल. त्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागणार नाही. कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. त्यामुळे कामातील उत्साह टिकून राहील. नवीन आलेले प्रस्ताव स्वीकारण्यास हरकत नाही. व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या प्रश्नावर त्वरित मार्ग मिळेल. नफ्याचे प्रमाण चांगले राहील. कर्ज वेळेत फेडाल. नोकरदार वर्गाला आवडीचे कार्य करावयास आवडेल. आर्थिक टंचाई भासणार नाही. १८ तारखेचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवस उत्तम असतील.
कन्या : महाशिवरात्रीचा दिवस सर्वासोबत हसतमुख जाईल. व्यवसायातून जे उत्पन्न मिळणार आहे त्यातच समाधान वाटेल. नोकरदार वर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. समाजमाध्यमांचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करून घ्याल. सप्ताहातील सर्वच दिवस चांगले राहतील. ज्या गोष्टींचा बरेच दिवस झाले तुम्ही प्रयत्न करत आहात, त्या प्रयत्नांना यश मिळेल. वारंवार मनामध्ये एखाद्या विषयी असणारी अडी तीही आता दूर होईल. सध्या स्वत:साठी जगावे असेच वाटेल.
तूळ : चांगल्या गोष्टींसाठी वाट पाहावी लागते याचा अनुभव येईल. तेव्हा संधी दारापर्यंत आलेली आहे ती डावलू नका. या संधीचा उपभोग घ्या. महाशिवरात्रीचा दिवस चांगला राहील. व्यवसायात जुने काही व्यवहार बाकी असतील तर ते पटकन करून घ्या. भागीदारी व्यवसायात असलेले वैचारिक मतभेद राहणार नाहीत. नोकरदार वर्गासाठी वरिष्ठांकडून विशेष लाभ मिळेल. आर्थिक सफलता मिळेल. या आठवडय़ात सर्व दिवस चांगले असतील. मागे काही दिवसांची भीती मनामध्ये ठेवू नका. निर्णय घेतला तर चुकीचा होईल का? असे वाटून घेऊ नका. मागे झालेल्या चुकांमुळे असे वाटणे साहजिक आहे.
वृश्चिक : व्यवसायात सारखे निर्णय बदलावेसे वाटले तरी बदलू नका. ही द्विधावस्था स्थिर कशी होईल ते पाहा. वर्तमान स्थितीचा आढावा घ्या. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत धीर धरावा लागेल. आर्थिकदृष्टय़ा सावधानता बाळगा. दिनांक १२, १३ रोजी भावनेच्या आहारी जाऊन कोणतीही गोष्ट करू नका. त्यामुळे गुंतागुंत कमी होण्याऐवजी वाढू शकते. बेफिकीर राहून चालणार नाही. इतरांवर आपली मते लादण्याचा प्रयत्न करू नका.महाशिवरात्रीच्या दिवशी केलेला संकल्प सोडायला विसरू नका.
धनू : चांगल्या दिवसाच्या कालावधीत कामे पूर्ण होणार आहेत. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही बरेच दिवस प्रयत्न करत असला आणि ती होत नसली तर ती सध्या होणारी आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. व्यवसायातील आवकजावक वाढेल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल.नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी होणारे नुकसान टाळता येईल. खर्चाची बाजू सांभाळा. दिनांक १४, १५ रोजीचे दोन दिवस तोंडात खडीसाखर, डोक्यावर बर्फ असे वातावरण ठेवावे लागेल. स्पष्ट बोलल्याने इतरांपेक्षा तुम्हाला त्रास होऊ शकतो. धीर धरा. महाशिवरात्रीचा दिवस लाभाचा ठरेल. बाकी सर्व दिवस चांगले असतील.
मकर : महाशिवरात्रीचा दिवस आनंदाचा असेल. बाकी दिवस उत्तम असतील. व्यावसायिकदृष्टय़ा कोणतेही व्यवहार जपून करा. उधारीपेक्षा रोखीच्या व्यवहारांना महत्त्व द्या. आजचे काम आजच करण्याची सवय ठेवा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची बोलणी खावी लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत हुशारीने वागा. दिनांक १६, १७ रोजी संयम ओलांडू नका. हळू आवाजात बोला. कोणाच्या वैयक्तिक गोष्टींवर चर्चा करू नका. त्यामुळे गैरसमज वाढू शकतात. एखादी जबाबदारी घेताना शब्दांत अडकू नका.
कुंभ : दिनांक १८ रोजीचा एकच दिवस सोडला तर सप्ताहातील सर्वच दिवस चांगले जातील. बऱ्याच दिवसांपासून असे वाटत होते की, जणू काही आपल्यावर संघर्षांची ठिणगी पडली आहे. कोणत्याही गोष्टीला वेग न येणे, अडथळे निर्माण होणे, त्यामुळे कामात उत्साह वाटत नव्हता. आता या सर्व गोष्टींना न्याय मिळणार आहे. शिवाय कामाला आता वेग येणार आहे. महाशिवरात्रीचा दिवस पळापळीचा राहील. नवीन व्यवसायाला सुरुवात होईल. व्यवसायासाठी केलेले नियोजन यशस्वी होईल.
मीन : महाशिवरात्रीचा दिवस लाभाचा असेल. व्यावसायिकदृष्टय़ा स्पर्धात्मक युगात टिकून राहाल. मालाची खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात कराल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून अपेक्षित प्रस्ताव येईल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात सामंजस्याने कृती कराल. मित्रपरिवारासोबत मनमोकळेपणाने बोलल्यामुळे मन हलके होईल. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे गुळाच्या चवीप्रमाणे राहील. ज्या गोष्टींविषयी मनामध्ये सतत चिंता निर्माण होती ती चिंता आता मिटणार आहे. ठरवलेले ध्येय साध्य होणार आहे. संवादातून समाधान वाटेल. सर्व दिवसांचा कालावधी चांगला राहील. (Weekly Rashi Bhavishya 12th to 18th February!)