मेष : या आठवडय़ात सर्व दिवस चढउताराचे असणार आहेत. या कालावधीत धरसोड वृत्ती निर्माण होणार आहे. सध्या कोणतीही गोष्ट करणे नुकसानीचे ठरणार आहे. हे नुकसान करून घेण्यापेक्षा थोडे थांबलेले चांगले. महत्त्वाचे निर्णय टाळा. आपल्या काही गोष्टी इतरांना पटवून देण्याची ही वेळ नाही. शांतपणाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे त्रास होणार नाही. व्यावसायिकदृष्टय़ा धावपळ होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल. आर्थिक नियोजन पक्के करा. बऱ्याच काळापासून रखडलेल्या कोणत्याही वस्तूची अचानक विक्री सुरू होईल, ज्यामुळे तुमच्या नफ्याचा मार्ग मोकळा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
वृषभ : सासरच्या बाजूने सुधारणा दिसून येईल. आर्थिकदृष्ट्या आज परिस्थिती थोडी तणावपूर्ण असू शकते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही समस्या भेडसावू शकतात, त्या सोडवण्यासाठी त्यांना त्यांच्या शिक्षकांच्या आशीर्वादाची आवश्यकता असेल. चांगल्या दिवसांच्या कालावधीमध्ये निर्णयक्षमता वाढेल. व्यवसायात मागील काही दिवसांपेक्षा सध्याची वाटचाल चांगली असणार आहे. नोकरदार वर्गाला कामात बदल करून चालणार नाही. अनावश्यक खर्च टाळा. दिनांक २८, २९ रोजी सावधानतेने पाऊल टाका. या दोन दिवसांत नको त्या गोष्टींचा मोह होईल. बरेच दिवस जो विषय डोक्यात घोळत होता तो विषय जिभेवर आणण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे वादविवाद वाढू शकतात. हे दोन दिवस शांत राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल.
मिथुन : व्यवसायामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाही ज्यामुळे तुमची आई तुमच्यावर नाराजी व्यक्त करू शकते. दिवसाच्या सुरुवातीपासून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी काही महत्त्वाच्या कामात व्यस्त असाल. व्यावसायिकदृष्टय़ा सक्षम बनाल. खरेदी-विक्री व्यवहार करताना अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. नोकरदार वर्गाला कामांमध्ये जो उत्साह वाटत नव्हता तो वाटायला लागेल. वायफळ खर्च टाळा. दिनांक ३० जून व १ जुलै असे दोन दिवस चलबिचल अवस्थेचे असतील. कोणत्याही गोष्टीचा विचार केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. इतरांचा सल्ला ऐकून घ्या. त्यांना प्रतिउत्तर करत बसू नका. तुम्हाला जे करायचे आहे तेच करा; पण त्यांना प्रत्युत्तर केल्यामुळे गैरसमजाचे वादळ निर्माण होऊ शकते.
कर्क : सप्ताहातील सर्व दिवस चांगले असतील. या चांगल्या कालावधीचा फायदा घेऊन ज्या कामांची सुरुवात होत नव्हती, ते करण्याचा प्रयत्न वाढवा. हा प्रयत्न यशस्वी होईल. व्यावसायिकदृष्टय़ा परिवर्तन घडेल. नोकरदार वर्गाने आपल्या कामाची जबाबदारी इतरांवर टाकून चालणार नाही. सध्या समाजसेवा करायची इच्छा नसली तरीसुद्धा ती करावी लागणार आहे. ज्या वेळी इतरांकडून मदत हवी असते त्या वेळी वेळेत मिळेल याची शक्यता कमी होती; पण सध्या मात्र ही मदत वेळेत मिळणार आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कौटुंबिक व्यवसायात फायदा होईल. मुलाच्या बाजूने घरातील वरिष्ठांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांमुळे तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.
सिंह : जर तुम्हाला व्यवसायात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो काळजीपूर्वक घ्या कारण तुम्ही घेतलेल्या निर्णयाला विरोध होऊ शकतो. कुटुंबात काही वाद सुरू असतील तर ते संयमाने सोडवू शकाल. मित्राशी मतभेद झाल्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. सरळमार्गी वाटचाल राहील. आजचे काम उद्यावर ढकलण्याची वेळ येणार नाही. आजचे काम आजच होईल अशी परिस्थिती सप्ताहात आहे. कामे वेळेत करण्याचा निश्चय दृढ करा. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात फायदा होईल. नोकरदार वर्गाच्या कामामध्ये जे अडथळे येत होते ते कमी होतील. आर्थिकदृष्टय़ा बचत करण्याकडे कल राहील. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक गोष्टींची आवड राहील. ग्रहमानाचे शुभ संकेत मिळतील यात शंकाच नाही. प्रत्येक गोष्ट वेळेत होऊ लागेल. इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही
कन्या : व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव चांगला राहील. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. भावंडांशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. कौटुंबिक वादविवाद होणार नाहीत, मात्र अबोला जाणवेल. दिनांक २५ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. मागील काही दिवसांपासून सतत जी चिंता तुम्हाला वाटत होती ती चिंता आता मिटणार आहे. कोणतेही काम करताना उत्साह वाटत नव्हता तो उत्साह आता वाढणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कोणत्याही शारीरिक वेदना मुलाला त्रास देऊ शकतात. आज काही सदस्यांमुळे सामाजिक मान-सन्मान कमी होण्याची शक्यता आहे,
तूळ : घरातील काही अपूर्ण कामे मार्गी लावावी लागतील. संध्याकाळी, तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह देव दर्शनासाठी जाऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. व्यावसायिकदृष्टय़ा ज्या गोष्टीत गुंतवणूक करून नफ्याचे प्रमाण चांगले राहणार आहे अशाच गोष्टीत गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहिलेले चांगले राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. २५ तारखेला दुपारनंतर दिनांक २६ व २७ असे हे दिवस फारसे चांगले आहेत, असे म्हणता येणार नाही. तेव्हा समोरून येणाऱ्या प्रतिक्रिया तुमच्यासाठी वादाच्या ठरू शकतात. अशा परिस्थितीत वादविवाद या गोष्टींपासून लांबच राहा. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून एखाद्या गोष्टीत माघार घेतलेली केव्हाही चांगली राहील.
वृश्चिक : व्यावसायिकांना क्षेत्रीय कामापेक्षा परदेशातील किंवा बाहेरच्या कामातून फायदा होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत मौजमजेसाठी काही पैसे खर्च कराल. व्यावसायिकांना प्रादेशिक कामाऐवजी परदेश किंवा बाहेरच्या कामातून फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चाललेल्या घडामोडींत जे बदल होणार आहेत ते स्वीकारा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मत पटले नाही तरी पटवून घ्यावे लागेल. खर्च नियंत्रणात ठेवा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करणे टाळा. दिनांक २८, २९ हे संपूर्ण दिवस द्विधा अवस्थेचे राहणार आहेत. या दोन दिवसांत आपण म्हणू तीच पूर्व दिशा असे करून चालणार नाही. समोरच्याचीही बाजू समजून घ्यावी लागेल. आपणच आपले म्हणणे देणे त्रासाचे ठरेल. बोलताना मागचापुढचा विचार करा. स्पष्ट बोलण्याने वादविवाद वाढू शकतात हे लक्षात ठेवा. कोणतेही काम करताना नियमांचे पालन करा.
धनू : या आठवड्यात वाटचाल सुरळीत होईल. व्यवसायात जे प्रकल्प हाती घेतले व त्याचा शुभारंभ होत नव्हता तो आता होणार आहे. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून चांगल्या कामाची पोचपावती मिळेल. आर्थिकदृष्टय़ा परिस्थिती चांगली असली तरी अनावश्यक खर्च टाळणे तुमच्याच हातात आहे. ३० जून व १ जुलै अशा या दोन दिवसांच्या कालावधीत सहनशीलता वाढवावी लागेल. हे दोन दिवस शांत बसलात तर त्रास होणार नाही. या दिवसांत कामात अडथळा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे महत्त्वाचे काम पुढे ढकला. तुम्हाला प्रवास टाळावा लागेल कारण प्रिय वस्तू चोरीला जाण्याची भीती आहे आणि आरोग्य देखील नरम गरम राहू शकते. मित्र आणि नातेवाईकांच्या तणावामुळे घरात कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
मकर : वैवाहिक जीवन आनंदी राहील. आयुष्याच्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता आणि मुलांबद्दल महत्त्वपूर्ण संभाषण देखील करू शकता. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित काही वाद असतील तर आज ते कुटुंबातील सदस्याच्या मदतीने सोडवले जाऊ शकतात. व्यावसायिकदृष्टय़ा मागील कमतरता भरून निघेल. नोकरदार वर्गाला नवीन काम करताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. आर्थिक परिस्थितीत चांगले बदल होतील. दिनांक २५ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. चंद्र ग्रहाची अनुकूलता शुभ गोष्टींची सुरुवात करेल. आतापर्यंत मनामध्ये व्यवस्थापन ठरवले जायचे; पण प्रत्यक्षात उतरवले नव्हते. आता हे व्यवस्थापन प्रत्यक्षात उतरवल्यामुळे कामाला गती येईल. अनेक मार्गातून प्रस्ताव येतील. हे प्रस्ताव स्वीकारणे फायद्याचे ठरेल.
कुंभ : व्यवसायातून जे उत्पन्न मिळणार आहे ते अपेक्षेपेक्षा चांगले असेल. नोकरदार वर्गाच्या कामातील त्रुटी दूर होतील. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. नातेवाईकांशी जपून संवाद करा. शेजाऱ्यांशी जेवढय़ास तेवढे राहा. दिनांक २६, २७ हे दोन दिवस कोणतेही काम उत्साहाने करावेसे वाटणार नाही. अंगामध्ये एक प्रकारचा आळस निर्माण होणार आहे; पण हा आळस त्रासदायक ठरणार आहे. प्रत्येक काम वेळेत होण्यासाठी प्रयत्न करा. जी जबाबदारी आपल्याला झेपणार नाही अशा जबाबदारीची हमी घेऊ नका. काही अपूर्ण काम पूर्ण केल्यावर तुम्हाला दुसरे काम करावेसे वाटणार नाही. वडिलांच्या तब्येतीत काही प्रमाणात बिघाड होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.
मीन : या आठवड्यात कोणावर अवलंबून राहिल्यास कुठलेच काम होणार नाही. त्यामुळे चिडचिड वाढेल आणि स्पष्ट बोलल्यामुळे वादविवाद होऊ शकतात. तेव्हा हा क्रोध आवरा. स्वत:चे काम स्वत: करा. यश मिळण्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. शांतपणाने मार्ग काढल्यास त्रास होणार नाही. व्यवसायात जे चालले आहे ते योग्य आहे असे समजून पुढे चला. नवीन काही व्याप वाढवू नका. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. समाजमाध्यमांचा वापर जेवढय़ास तेवढा करा. महागाईच्या काळात तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखावे लागेल. व्यवसायात एखादे दुकान आणि योजना सुरू करू शकाल, त्यामुळे बाजूचे आणि विरोधी पक्षांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी संपतील.