मेष : कोणतीही कृती करताना घाई करू नका, संयम ठेवा. सध्या सप्ताहात विचार करूनच पाऊल टाकावे लागेल. ऐकीव बातमीवर विश्वास ठेवणे त्रासाचे राहील. होऊन गेलेल्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत असणाऱ्या अडचणी सोडवताना वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे लागेल. व्यवसायात स्पर्धेच्या मागे धावू नका. गुंतवणूक जपून करा. आर्थिक बाबतीत तडजोड स्वीकारावी लागेल. राजकीय क्षेत्रात कामातील उत्साह कमी होईल. कुटुंबातील वाद टाळा.
शुभ दिनांक : ३१, १
वृषभ : इतरांच्या कोणत्याही भानगडीत न पडता स्वत:साठीच वेळ द्या. कोणालाही कोणत्याही प्रकारचा सल्ला देत बसू नका. नोकरदार वर्गाला कोणतेही काम करताना दडपण राहणार नाही. व्यवसायात व्यवहाराच्या बाबतीत उधारीचा व्यवहार करण्याचे धाडस करू नका, त्यामुळे नुकसान होऊ शकते. आर्थिकदृष्टय़ा खर्च जपून करा. मैत्रीच्या नात्यातील सलोखा वाढेल. मुलांविषयी वाटणारी चिंता मिटेल. घरगुती वातावरण आनंदी राहील.
शुभ दिनांक : २, ३
मिथुन : नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत अनुकूल बदल घडतील. महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने कामातील उत्साह वाढेल.सप्ताहातील सर्व दिवसांचा कालावधी उत्तम असेल. पर्यायी गोष्टींना मार्ग मिळेल. व्यवसायात पूर्वीपेक्षा परिश्रम कमी करावे लागतील. त्या मानाने फायद्याचे प्रमाण चांगले राहील. भांडवलात वाढ झाल्याने आगामी काळासाठी योग्य अशी तरतूद कराल. आर्थिक अडचणी कमी होतील. घरगुती वातावरण चांगले राहील. तरुण वर्गाला विवाहाचे प्रस्ताव येतील.
शुभ दिनांक : ४, ५
कर्क : मागील काही दिवसांपासून मनामध्ये गोंधळ निर्माण करणारी परिस्थिती आता दूर होईल. सहज मार्गे कामे होत राहतील. नोकरदार वर्गाने वरिष्ठांशी कामानिमित्त संवाद ठेवा. व्यवसायात अनेक माध्यमांतून लाभ होईल. धार्मिक गोष्टीतील उत्साह वाढेल. मानसिक ताणतणाव कमी होईल. गुंतवणूक करण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. आर्थिक आवक उत्तम राहील. सामाजिक बांधिलकी जपताना नकळत आपल्याकडून कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईकांशी कार्यक्रमाविषयी चर्चा कराल.
शुभ दिनांक : ३१, २
सिंह : कामकाज वेळेत होऊ लागेल. हाती घेतलेल्या कामाला यश मिळेल. इतरांचे सहकार्य घ्यावे लागणार नाही. नोकरदार वर्गाने नियोजनानुसार कामाचे स्वरूप ठरवल्याने अडथळय़ांचे प्रमाण कमी होईल. व्यापारी क्षेत्रात देवाणघेवाण उत्तम राहील. गुंतवणूक करताना संभ्रमावस्था राहणार नाही. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. व्यावसायिकदृष्टय़ा दुहेरी लाभ मिळेल. आर्थिकदृष्टय़ा उधारी वसूल होईल. भावंडांच्या बाबतीत निर्णय घेताना ज्येष्ठांना विश्वासात घ्या. जोडीदारासोबत पर्यटन स्थळाला भेट द्याल.
शुभ दिनांक : ३१, १
कन्या : आपल्या कामाची महत्त्वाची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकून चालणार नाही. स्वत:च्या जबाबदारीवर कामे करावी लागतील हे लक्षात घ्या. नोकरदार वर्गाला कामकाजाचे नियोजन परिपूर्ण करावे लागेल. व्यवसायात ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन पुरवठा वाढवावा लागेल. समोरून आलेले प्रस्ताव स्वीकारा. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रातील चर्चा मर्यादित ठेवा. भावंडांशी संवाद साधल्याने मानसिक समाधान वाटेल. दिनांक ३१, १ हे दोन दिवस ज्या गोष्टीतून मनस्ताप होणार आहे अशा गोष्टींचा विचार टाळा.
शुभ दिनांक : २, ३
तूळ : नोकरदार वर्गाने जुने अनुभव विसरून चालणार नाही. कामामध्ये सतर्क राहा. व्यवसायात भागीदारी व्यवसायापेक्षा स्वतंत्र व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. आगामी काळासाठीचा गुंतवणुकीचा विचार सध्या न केलेला चांगला. आर्थिक बाबतीत अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. राजकीय क्षेत्रात पुढारकीपणा करणे टाळा. कुटुंबात सर्वासोबत करमणूक होईल. मानसिकदृष्टय़ा द्विधा अवस्था कमी होईल. आरोग्य ठणठणीत राहील. दिनांक २, ३ रोजी महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. इतरांच्या सांगण्याने कोणतेही काम करू नका. कायदा क्षेत्रात नियमांचे पालन करा.
शुभ दिनांक : ३१, १
वृश्चिक : नोकरदार वर्गाने अधिकारी व्यक्तींशी मोजकेच बोललेले चांगले. व्यापारी क्षेत्रात भांडवल गुंतवताना आवक-जावक प्रथम पडताळा, त्यानंतर गुंतवणूक करा. गुंतवणुकीचे मोठे आवाहन स्वीकारू नका. आर्थिक नियोजन योग्य रीतीने करा. राजकीय क्षेत्रात बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक सौख्य लाभेल. मानसिक चिडचिड कमी होईल. प्रकृती ठीक राहील. दिनांक ४, ५ हे संपूर्ण दिवस व ६ तारखेला दुपापर्यंत असा हा कालावधी जेमतेम राहील. नेमक्या याच कालावधीत चांगल्या गोष्टी करण्याचा मोह निर्माण होईल. मात्र त्या टाळलेल्या चांगल्या.
शुभ दिनांक : २, ३
धनू : स्वत:मध्ये कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरीही तो होत नव्हता. सध्या हा बदल परिस्थितीच घडवून आणेल. हा झालेला बदल तुमच्यासाठी चांगलाच असेल. नोकरदार वर्गाला बौद्धिक क्षेत्रात शुभसंकेत मिळतील. व्यापारी क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे उत्पादन वाढेल. व्यावसायिकदृष्टय़ा महत्त्वाचे निर्णय घेता येतील. आर्थिकदृष्टय़ा यशस्वी घडामोडी राहतील. राजकीय क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. घरगुती वातावरण अनुकूल राहील. मानसिक शांती लाभेल. प्रकृती साथ देईल. कामापुरते जवळ करणाऱ्या मैत्रीपासून लांब राहा.
शुभ दिनांक : ३१, १
मकर : नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या काही गोष्टी नाही पटल्या तरी त्या पटवून घ्याव्या लागतील. व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात उतरू लागतील. ग्राहक वर्ग संतुष्ट राहील. उधार- उसनवारीचे व्यवहार पूर्ण होतील. आर्थिक बचत होईल. राजकीय क्षेत्रात होणाऱ्या चर्चेवर प्रतिक्रिया न दिलेल्या चांगल्या. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. मानसिकदृष्टय़ा मनोधैर्य वाढेल. आरोग्य ठणठणीत राहील. दिनांक ३१, १ हे दोन दिवस भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका.
शुभ दिनांक : २, ३
कुंभ : कोणताही बदल करताना नीट विचार करा. घाईगडबडीने निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. बाकी दिवस चांगले जातील. नोकरदार वर्गाची धावपळ कमी होईल. व्यवसायात होणारा फायदा-तोटा वेळीच लक्षात घेऊन प्रयत्नवादी राहा. भागीदारी व्यवसायासाठी नवीन करार करावयास हरकत नाही. आर्थिक बाबतीत जमेची बाजू राहील. राजकीय क्षेत्रात विलंबाने का होईना, पण तुमचे ध्येय पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. दिनांक २, ३ हे दोन दिवस बोलताना शब्द जपून वापरा.
शुभ दिनांक : ३१, ५
मीन : बोलण्याचे ताळतंत्र बिघडू देऊ नका. मोजक्या बोलण्यावर भर द्या. नोकरदार वर्गाला नियमावलीनुसार काम करावे लागेल. व्यावसायिक करार सध्या करणे टाळा. लघुलेखन, वृत्तपत्रे संपादक, पत्रकार, बातम्या इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना आपले मुद्दे योग्य पद्धतीने मांडावे लागतील. आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे राहील. शारीरिकदृष्टय़ा दुखणे अंगावर काढू नका. सामाजिक माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने करा. कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करताना वाद होणार नाही त्याची काळजी घ्या. कुठेही उग्र रूप धारण करू नका.
शुभ दिनांक : २, ३