मेष : या आठवड्यात तुम्ही आराम करणार आहात. व्यवसायात यशस्वी वाटचाल राहील. आर्थिकदृष्टया अनपेक्षित लाभ होईल. पण खर्च देखील वाढणार आहेत. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाईल. वादविवाद टाळावेत. नोकरदार वर्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनसारखे यश मिळेल.
वृषभ : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता कमी होईल. व्यवसायात कष्ट वाढले तरी फायद्याचे प्रमाणही चांगले असेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आर्थिकदृष्टया सक्षम बनाल. तरीही उत्पन्नाचे नवे मार्ग शोधावे लागतील. रखडलेली कामे मार्गी लावणार आहात.
मिथुन : विनाकारण चिडचिड करण्यात वेळ वाया घालवू नका. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मनोबल कमी असल्याने दैनंदिन कामे नकोशी होतील. नवीन गुंतवणूक टाळा. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरदार वर्गाने कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा कंटाळा कराल. प्रवास आज नकोत. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी वादाच्या ऐवजी चर्चेचा वापर करणे तुमच्यासाठी योग्य राहील.
कर्क : या आठवड्यात सध्या सर्व दिवस जपून हाताळावे लागतील. मुला-मुलींकरिता वेळ देणार आहात. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. काहींना अनपेक्षितपणे प्रियजन भेटणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. समाजमाध्यमांपासून सध्या तरी लांब राहा. प्रवास सुखकर होणार आहेत. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. शेअर बाजार, सट्टा आणि इतर कोणत्याही धोकादायक ठिकाणी पैसे गुंतवू नका.
सिंह : कोणाशीही वादविवाद घालायला जाऊ नका. आज तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. कोणतेही खरेखोटे करण्याच्या भानगडीत पडू नका. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. घरातील कामांना प्राधान्य देणार आहात. प्रेमसंबंधाचे रूपांतर विवाहात करण्याची परवानगी मिळू शकते.
कन्या : किरकोळ गोष्टींसाठी होणारा खर्च आटोक्यात ठेवा. नातेवाइकांना भेटण्यास जाल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. आरोग्य उत्तम राहील. राजकीय क्षेत्रात उत्साह वाढेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणार आहात. घरगुती वातावरण चांगले राहील. प्रवासास अनुकूलता आहे. करिअर आणि व्यवसायात आश्चर्यकारक प्रगती होईल.
तुळ : सध्या अपेक्षा नसतानासुद्धा समोरच्या व्यक्तीकडून मदत मिळेल. आजचा दिवस आपण कौटुंबिक प्रियजनांसमवेत व्यतीत करणार आहात.नोकरदार वर्गाचे कामात मन रमेल. मनोबल उत्तम राहील. अनेकांशी सुसंवाद साधाल. मुलांचे लाड करा. पण शिस्त बिघडू देऊ नका. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. मनोबल उत्तम असणार आहे. व्यापाऱ्यांनी या काळात कोणत्याही योजनेत पैसे गुंतवताना फार काळजी घेतली पाहिजे.
वृश्चिक : या आठवड्यात आलेली कोणतीही चांगली संधी सोडू नका. आज तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडणार आहे. व्यवसायिकदृष्टया कष्ट वाढले तरी फळही चांगले मिळेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता संपणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रेमसंबंधात कोणत्याही मुद्द्यावर घाईगडबड करू नका.
धनु : या सप्ताहात व्यवसायातून मिळालेले उत्पन्न चांगले असेल. नको त्या गोष्टीवर तुमचा वेळ खर्च होईल. तुमची चिडचिड होणार आहे. वायफळ खर्च टाळा. कामे रखडतील. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. नातेवाईकांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. काहींना एखादी चिंता लागून राहील. आठवड्याच्या मध्याला व्यवसायच्या दृष्टीने केलेला प्रवास मोठे बदल घडवण्याची शक्यता राहील.
मकर : व्यवसायात धरसोड वृत्ती राहील. आज तुम्ही प्रियजनांकरिता वेळ देणार आहात. संततीचे कोडकौतुक कराल. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचा सल्ला घ्या. जुन्या आठवणींमध्ये रमणार आहात. मैत्रीचे नात्यात रूपांतर होण्याची शक्यता. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. नोकदार व्यक्तींना या काळात अतिरिक्त उत्पन्नांचे मार्ग मिळण्याची दाट शक्यता.
कुंभ : व्यवसायात उधारीचे व्यवहार टाळा. उत्साही राहाल. अनेक कामात यश मिळवणार आहात. खर्च जपून करा. आनंदी व आशावादी राहाल. कौटुंबिक वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. मानसिक सौख्य व समाधान लाभणार आहे. काहींना मान-सन्मान लाभेल.प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात अनुकूलता लाभेल.एखाद्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल.
मीन : अपेक्षित लाभ होईल. मनोबल वाढेल. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता संपणार आहे. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. रखडलेल्या कामात सुयश मिळवाल. आर्थिक प्रश्न सुटतील. त्यामुळे एखादी आनंददायी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. अनपेक्षित प्रवास संभवतात. या सप्ताहात कोणत्याही जोखिमच्या गुंतवणुकीपासून दूर राहा. तुम्हाला अर्थिक फटका बसू शकतो.