मेष : आठवड्याच्या सुरुवातीत नोकरी करणार्या लोकांसाठी फारच प्रगतिकारक आहे. तुम्ही तुमचे कार्य नवीन उत्साह आणि जोषात पूर्ण कराल. आठवड्याच्या सुरुवातीत तुमचा उत्साह कायम राहणार आहे. दिनांक ७ रोजी संपूर्ण दिवस व तारीख ८ रोजी दुपापर्यंत या कालावधीत कितीही घाई करावीशी वाटली तर करू नका. हा दीड दिवसांचा कालावधी फारसा अनुकूल नाही. मात्र त्यानंतरचे सर्वच दिवस उत्तम असतील. प्रेमसंबंधात एखाद्या स्त्रीमुळे परस्पर द्वेष निर्माण होऊ शकतो किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
वृषभ : आठवड्याच्या सुरुवातीत मुलांची काळजी राहण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला मानसिक संतुलित ठेवणे आवश्यक आहे. दिनांक ८ रोजी दुपारनंतर ९ तारखेला संपूर्ण दिवस व १० तारखेला दुपापर्यंत असा हा कालावधी जपूनच पाऊल टाकलेले चांगले. घाईगडबडीने निर्णय घेतल्यास एखादी गोष्ट अंगलट येईल हे लक्षात घ्या. तेव्हा शांत डोक्याने निर्णय घ्या. या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न तेव्हाच प्रभावी ठरतील जेव्हा तुम्ही स्वतः कोणत्याही निर्णयावर पोहोचणार.
मिथुन : आठवड्याच्या पहिल्या दिवशी पारिवारिक संबंधांमध्ये तणाव येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाचा साथ मिळणार आहे. कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. सध्या एखादी गोष्ट मनात आली म्हणून ती केली असे करून चालणार नाही. त्यासाठी थोडासा धीर धरा. महत्त्वाच्या गोष्टी पुढे ढकललेल्या चांगल्या. कोणत्याही गोष्टीत कितीही काळजी घेतली तरी सुद्धा चढउतार राहणार आहे. जे आहे त्यातच समाधान मानायला शिका. या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात काही समस्या निर्माण होऊ शकतात आणि एकाकीपणाचा सामना करावा लागेल.
कर्क : आठवड्याच्या सुरुवातीत आर्थिक ओढताण राहण्याची शक्यता आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.आठवड्याच्या सुरुवातीत तुमच्यात अधिक साहस वृत्ती राहणार आहे. व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. चंद्रग्रहाचे भ्रमण अनुकूल कसे होईल या दृष्टीने प्रयत्न करा. सप्ताहातील सर्वच दिवस कासवाच्या गतीने वाटचाल केल्यास यश मिळणार आहे. आपल्याच हातामध्ये असलेल्या गोष्टी वाढवू नका. इतरांवर अवलंबून केलेले कोणतेही काम गुंतागुंतीचे राहील. प्रेमसंबंधात वेळ रोमँटिक जाईल आणि मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याचा निर्णयही घेऊ शकता.
सिंह : आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. या आठवड्यात कुठल्याही प्रकारचा नवीन धैर्य दाखवू नका. शेअर बाजार, कमिशन, दलाली इत्यादी कार्यांमध्ये आंशिक लाभ मिळण्याची उमेद तुम्ही ठेवू शकता. दिनांक १० तारखेला दुपारनंतर ११ तारीख संपूर्ण दिवस व १२ तारखेला दुपापर्यंत अशा या कालावधीत गोष्टी हाताबाहेर जाणार नाहीत याची काळजी घ्या. कायदा क्षेत्रात नियमांचे पालन करा. प्रतिष्ठेसाठी कोणतीही गोष्ट पणाला लावू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. पौर्णिमा शांततेत पार पाडा. व्यवसायात बदलती घडामोड राहील.प्रेमसंबंधात वेळ अनुकूल राहील आणि परस्पर प्रेमही दृढ होईल. या आठवड्यापासून तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधातही बरेच बदल दिसतील.
कन्या : आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमच्यात आवेश आणि राग याचे प्रमाण जास्त राहणार आहे. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. दिनांक १२ रोजी दुपारनंतर व १३ संपूर्ण दिवस एवढा कालावधी सोडला तर बाकी दिवस उत्तम जातील. जी गोष्ट हाती घ्याल त्यामध्ये यश संपादन कराल. विस्कळीत झालेली घडी पुन्हा व्यवस्थित होईल. तुमच्या प्रेम जीवनासाठी हा आठवडा चांगला आहे आणि आयुष्यात आनंद दार ठोठावेल.
तूळ : आठवड्याची सुरुवातीत थोडी बैचेनी राहणार आहे. या आठवड्यात तुमचे अडकलेले काम पूर्ण होतील. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. दिनांक २, ३ रोजी महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. इतरांच्या सांगण्याने कोणतेही काम करू नका. कायदा क्षेत्रात नियमांचे पालन करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रेमप्रकरणाबद्दल चिंता वाटेल आणि चिंता वाढू शकते. एखाद्या विशिष्ट ठिकाणाबाबतही मन दु:खी होऊ शकते.
वृश्चिक : आठवड्याच्या सुरुवातीत घरात एखादे शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाणी आणि आपल्या व्यवहारावर विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे, आणि स्वतःवर संयम ठेवणे फारच गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत देखील हा आठवडा फारसा उत्तम नाही आहे, म्हणून वायफळ खर्च करणे टाळावे.दिनांक ४, ५ हे संपूर्ण दिवस व ६ तारखेला दुपापर्यंत असा हा कालावधी जेमतेम राहील. नेमक्या याच कालावधीत चांगल्या गोष्टी करण्याचा मोह निर्माण होईल. मात्र त्या टाळलेल्या चांगल्या. प्रेमसंबंधात वेळ अनुकूल राहील आणि मन आपल्या जोडीदारासोबत एखाद्या प्रवासाकडे आकर्षित होईल.
धनू : आठवड्याच्या सुरुवातीत व्यावसायिक आणि करियरशी निगडित जातक व्यस्त राहतील आणि त्यांना यश देखील मिळण्याची शक्यता आहे. व्यापार-व्यावसायिकांना दिवस संमिश्र. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्र ग्रहाचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण शुभदायक असेल. स्वत:मध्ये कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरीही तो होत नव्हता. सध्या हा बदल परिस्थितीच घडवून आणेल. या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात हळूहळू रोमान्सचा प्रवेश होत आहे आणि तुम्हाला जीवनात आनंद आणि सुसंवाद मिळेल.
मकर : आठवड्याच्या सुरुवातीत भाग्याचा साथ कमीच मिळेल. पण दरीदेखील लाभ मिळण्याची शक्यता आहे. इतरांनी दिलेले मदतीचे आश्वासन ते पूर्ण करण्यास समर्थ स्थितीत राहतील. दिनांक ३१, १ हे दोन दिवस भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. नाते हे भावनांवर चालते, जग हे व्यवहारावर चालते हे मात्र विसरू नका. या गोष्टींची काळजी घेतल्यास कोणतेही नुकसान होणार नाही. प्रेमसंबंधात काळ अनुकूल राहील आणि परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेम जीवनामध्ये खूप आनंदी असाल.
कुंभ : आठवड्याच्या पाहिल्या दिवशी तुम्हाला स्वास्थ्य संबंधी लहान सहानं तक्रारी राहू शकतात. भाऊ बहिणींबरोबर तुमचे संबंध अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सर्वांची मदत मिळणार आहे.दिनांक २, ३ हे दोन दिवस बोलताना शब्द जपून वापरा. बोलून वाईटपणा घेऊ नका. कोणताही बदल करताना नीट विचार करा. घाईगडबडीने निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. बाकी दिवस चांगले जातील. नोकरदार वर्गाची धावपळ कमी होईल. व्यवसायात होणारा फायदा-तोटा वेळीच लक्षात घेऊन प्रयत्नवादी राहा.या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रेमप्रकरणामुळे चिंतेत असाल आणि मन उदास राहील. तुमच्या रोमँटिक जीवनासाठी हा आठवडा कठीण आहे.
मीन : आठवड्याच्या सुरुवातीत वैवाहिक जीवनात थोडे ताण तणाव राहण्याची शक्यता आहे. तुमचे सर्व स्वप्न या आठवड्यात साकार होणार आहे, असे संकेत दिसून येत आहे. षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. सप्ताहातील चढ-उतार लक्षात घ्या. बोलण्याचे ताळतंत्र बिघडू देऊ नका. मोजक्या बोलण्यावर भर द्या. मागील गोष्टी उगाळू नका. नोकरदार वर्गाला नियमावलीनुसार काम करावे लागेल. व्यावसायिक करार सध्या करणे टाळा. प्रेमसंबंधात काळ अनुकूल राहील आणि परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय देखील घेऊ शकतात.