मेष : आपण आपल्या कार्यक्षेत्रात परिस्थितीला सामोरे जाताना काही मर्यादा आखून घेणे गरजेचे आहे. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. व्यवसायातून अपेक्षित फायदा होणार आहे. स्थावराशी संबंधित अथवा सरकारी कामे कालावधीत मार्गी लागतील. खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. व्यावसायिकदृष्टय़ा मोठी गुंतवणूक कराल. या गुंतवणुकीतून बराच फायदा मिळेल. मिळालेल्या फायद्याचा आगामी काळासाठी वापर करा. नोकरदार वर्गाच्या कामात झालेले बदल चांगले असतील. आर्थिक लाभ होईल. सामूहिक गोष्टींची आवड राहील. मित्र-मैत्रिणींच्या कामासाठी वेळ काढावा लागेल. भावंडांविषयी असलेली काळजी मिटेल.
वृषभ : आर्थिक उत्कर्षाचा कालावधी राहील. विवाहितांना जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मार्गदर्शक व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी ठरणार आहे. प्रेमिकांना अपेक्षित प्रतिसादासाठी प्रिय व्यक्तीचे मन वळवावे लागेल. संततीने घेतलेल्या मेहनतीचे चीज झालेले दिसेल. मुलांचे त्यांच्या क्षेत्रात कौतुक होईल.सर्वच दिवस चांगले असल्यामुळे शुभकार्याची सुरुवात होईल. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मदतीची अपेक्षा भासणार आहे त्या त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. इतरांचे सहकार्य उत्तम मिळेल. सहजगतीने मार्ग मिळत जातील. ज्या गोष्टींची तुम्ही काही दिवसांपासून वाट पाहत आहात त्या गोष्टीसंदर्भात आनंदाची बातमी कळेल. व्यावसायिक भरभराट चांगली राहील. नोकरदार वर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक पाठबळ वाढेल.
मिथुन : आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत सहभाग टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. व्यावसायिकदृष्टय़ा खरेदी-विक्रीचे व्यवहार जपून करा. गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाला कामातील त्रुटी सुधाराव्या लागतील. खर्चाची तरतूद करावी लागेल. समाजसेवा करताना मानसिक समतोलता राखा. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील.
कर्क : योजना आखाव्या लागतील आणि त्या सहकाऱ्यांकडून पूर्ण करून घ्याव्यात. बरोबरचे सहकारी वरिष्ठ या दोघांची उत्तम साथ मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल आणि आर्थिक लाभही वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. कमिशनचे अथवा ट्रेडिंगचे व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. व्यवसायातील फायदा वाढेल. व्यवसायात नियोजनाला महत्त्व द्या. त्यानुसार कामकाज केल्यास त्रास वाढणार नाही. भागीदारी व्यवसायात हिशोबाच्या नोंदी ठेवा. नोकरदार वर्गाला आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवाव्या लागतील. आर्थिक बाबतीत व्यवहार रोखठोक करा. समाजमाध्यमांचा वापर सध्या टाळा. मित्र-मैत्रिणीच्या नात्यांमध्ये विनोदाने बोलल्या जाणाऱ्या गोष्टींचा फार मोठा बाऊ करू नका.
सिंह : नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाला उत्तम दाद मिळेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ लाभेल. सोबतच आपण केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान देखील लाभणार आहे. वाहन सौख्य मिळेल. कौटुंबिक जिवन अनुकुल राहील. जोडीदाराची साथ लाभेल. व्यवसियाकांनी व्यवसायात केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. येतील. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. व्यवसायात पर्यायी व्यवस्था करावी लागेल. पळापळीचा मार्ग स्वीकारावा लागेल. व्यावसायिकदृष्टय़ा पळापळ झाली तरी ती नफा वाढवणारी असेल. नोकरदार वर्गाने आपले काम बिनचूक करणे गरजेचे राहील. अन्यथा वरिष्ठांचे बोलणे खावे लागेल. खर्चाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करा.
कन्या : कोणतेही काम करताना कंटाळा येणार नाही. सर्व गोष्टींत उत्साह वाटेल. लांबलेल्या कामांना गती येईल. मोठय़ा उद्योगधंद्यांना चालना मिळेल. तांत्रिक अडचणींचा सामना दूर होईल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. आर्थिक संकल्पना मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात नावलौकिक होईल. व्यय, लग्न आणि धनातील चंद्रभ्रमणात परिस्थिती संयम ठेवून हाताळा अन्यथा प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गास प्रतिकुल काळ असणार आहे. काळजीपूर्वक व्यवहार करावेत. गुप्तशत्रु विरोधकांचा त्रास जाणवेल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास अस्वस्थता जोडीदाराशी वादविवाद असे प्रसंग घडतील.
तूळ : व्यवसायात अनपेक्षित लाभ होईल. इतरांची देणी वेळेत फेडाल. नोकरदार वर्गाला कामाच्या व्यापातून इतर ठिकाणी लक्ष घालणे जमणार नाही. आर्थिक आवक उत्तम राहील. सध्या समाजमाध्यमापासून लांब राहा. दिनांक २६, २७, २८ असे हे तीन दिवस शब्दाने शब्द वाढणार आहे, अशा वेळी कमी बोललेले चांगले हे लक्षात ठेवा. कारण नसताना वादविवादाचे प्रसंग येऊ शकतात. त्यामुळे हे तीन दिवस सतर्कता बाळगा. आपण स्वत: कोणतीही गोष्ट पाहिल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देऊ नका आणि द्यायची झाल्यास तर या दिवसांत देऊ नका. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. आपल्या कार्यक्षेत्रात नव्या कल्पना व युक्त्या यानी थोडेफार हुरूळुन जाल. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. मध्यान्न काळानंतरआरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
वृश्चिक : या कालावधीत ही कामे होणार आहेत. व्यवसायात चढ-उतार राहिला तरीसुद्धा फायदा मोठय़ा प्रमाणात होईल. कलाकुसरीच्या वस्तूंना मागणी राहील. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत ठरवलेले ध्येय साध्य करता येईल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. सार्वजनिक क्षेत्रात सहभाग राहील. घरगुती वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. १ व २ तारखेला पळापळ होणार आहे. केलेले नियोजन फसणार आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवता येणार नाही. कामे वेळेत झाली नाहीत म्हणून स्वत:हून त्रास करून घेऊ नका. हे दोन दिवस असेच असल्यामुळे समजून घ्या. या दिवसांत कोणत्याही महत्त्वाच्या बाबी करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला आहे.
धनू : सध्या सावधानता बाळगावी लागणार आहे. उचलली जीभ टाळय़ाला लावून चालणार नाही. बोलण्याआधी मागचापुढचा विचार करा. इतरांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या. सध्याचे वातावरण या सर्व गोष्टी दूषित करणारे आहे. त्यामुळे भडक प्रतिक्रिया देणे टाळा. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील अतिशय शुभप्रद घटना या सप्ताहात घडतील. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.
मकर : व्यवसायातील घडी सुरळीत चालू असताना न झेपणारे बदल करू नका. त्यामुळे बसलेली घडी विस्कळीत होऊ शकते. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळा. समाजसेवा करताना सामंजस्याने कृती करा. दिनांक १, २ रोजी काही निर्णय असे घ्यावे लागणार आहेत, त्यावर विचार करायला वेळ मिळणार नाही. तरीसुद्धा बेकायदेशीर गोष्टी करू नका आणि नियमांचे पालन करा. मोठय़ांचा सल्ला घ्या. कुठेही उग्र रूप धारण करू नका. घरातील मतभेद सामोपचाराने मिटविलेले बरे अन्यथा त्रासदायक ठरतील आर्थिक दृष्ट्या ओढाताणीचा कालावधी आहे. जमिनीचा व्यवहार जपून करावा लागणार आहे. पैसे मिळण्यास विलंब होईल किंवा व्यवहार अर्धवट होण्याची संभावना आहे. मानसिक स्थिती अस्थिर राहिल. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कुंभ : भागीदारी व्यवसायात फार मोठी गुंतवणूक करू नका. नवीन भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नये. खर्च आटोक्यात ठेवा. समाजमाध्यमांचा वापर जेवढय़ास तेवढा करा. मैत्रीचे रूपांतर नात्यात होईल. दिनांक ३, ४ रोजी कोणाचा सल्ला घेऊही नका आणि कोणाला सल्ला देऊही नका. कारण नसताना किरकोळ गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे हे दोन दिवस थोडे शांततेने घ्या. परिस्थिती कशीही असो ती सावरण्याचा प्रयत्न करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. नोकरीत बढ़तीची बातमी मिळेल. भावडांशी संयमाने रहावे नाही तर त्यांच्या पासुन दुरावण्याची शक्यता आहे. सुशिक्षीत तरुणवर्गास नोकरी शोधण्यासाठी फार कष्ट सोसावे लागणार नाही. आपणास इच्छित नोकरी त्वरीत मिळेल.आपला मोठ्या समारंभात सहभाग असेन.
मीन : व्यवसायात खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न वाढवा. व्यवसायातील थकबाकी जमा होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. राजकीय क्षेत्रात चर्चा फलदायी ठरेल. मित्र-मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने गप्पा माराल. संततीची गोड बातमी कळेल. शुभ ग्रहांची साथ उत्तम राहील. सप्ताहातील सर्वच दिवस चांगले असल्यामुळे कामातील उत्साह वाढणार आहे. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना बदनामी व कुप्रसिद्धीला सामोरे जावे लागेल. प्रेमी युगुलांसाठी काळ प्रतिकुल आहे. बोलताना वादविवाद टाळा. प्रेमी युगुलांनी प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपून घेणे गरजेचे आहे. फसवणूकीची संभावना आहे. सप्तमातील चंद्र गोचर पतीपत्नीतील मतभेद वाढविणारे आहे. अवास्तव खर्च टाळणे.