मेष : व्यावसायिकदृष्टय़ा नेमक्या गोष्टी करता येतील ते पाहा. श्रमात वाढ होईल. फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाचे कामकाज सफल होईल. खर्च कमी करा.राजकीय क्षेत्रात होणारे बदल स्वीकारा. मित्रपरिवारासोबत गप्पांमध्ये रमून जाल. मुलांसोबत करमणुकीचा बेत आखाल. घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. दिनांक १३, १४ रोजी कितीही ठरवून गोष्टी करायच्या ठरवल्या तरी त्या होणार नाहीत. त्यामुळे चिडचिड वाढेल. वेळेचे भान ठेवून वागा.
वृषभ : चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा केलेला फायद्याचा ठरेल.व्यवसायात यशस्वी वाटचाल राहील. आगामी काळासाठी तरतूद कराल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरदार वर्गाच्या कामाबाबतीत असलेल्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक घडामोडीत बदल होतील व ते समाधान वाढवणारे असतील. सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला राहील. कोणत्याही गोष्टीची घाई न करता नियोजन करणे उत्तम जमेल.
मिथुन : स्वत:चे काम स्वत:च केलेले चांगले, याचा अनुभव मात्र येईल. अडचणीचा कालावधी कमी झाल्याने कामातील उत्साह वाढेल. व्यवसायवाढीसाठी केलेल्या जाहिरातीचा फायदा होईल.स्पर्धात्मक युगात टिकून राहणे अवघड वाटणार नाही. व्यवसायाला एक प्रकारची कलाटणी मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांनी दिलेली कामाची जबाबदारी पार पाडाल. आर्थिक बाबतीत परिस्थिती चांगली असेल. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. नातेवाईकांशी सलोखा वाढेल. भावंडांशी हितगुज साधाल.
कर्क : या आठवडय़ात वेळ आलेली आहे, संधी सोडायची नाही. हे लक्षात ठेवा व प्रलंबित कामाचा श्रीगणेशा करा. व्यावसायिकदृष्टय़ा आलेले प्रस्ताव स्वीकारा. द्विधावस्था न ठेवता स्थिर राहून निर्णय घ्या.नोकरदार वर्गाला कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. आर्थिक संकल्पना मार्गी लागतील. समाजसेवेची आवड निर्माण होईल. दूरच्या नातेवाईकांची भेटीगाठी होतील. जोडीदाराची साथ मिळेल. मानसिकदृष्टय़ा हुरहुर कमी होईल.
सिंह : व्यवसायात जुने काही व्यवहार डोके वर काढणार नाहीत ना, याची काळजी घ्या. त्यासाठी हिशोबाची नोंद ज्या त्या वेळी ठेवत जा. स्वतंत्र व्यवसायाला महत्त्व द्या.नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात सध्या करता येणार नाही. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढय़ास तेवढा करा. प्रयत्नशील राहादिनांक ८, ९ असे हे दोन दिवस कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करायला जाऊ नका.
कन्या : वनस्पतीजन्य व्यवसायात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करू नका. व्यवसायातसुद्धा गरजेपुरत्याच गोष्टींचा विचार करा. नोकरदार वर्गाला कामामध्ये झालेले बदल स्वीकारावे लागतील. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी करा.राजकीय क्षेत्रात नवे तंत्र फलदायी ठरेल. दिनांक १०, ११, १२ असे हे तीन दिवस शब्दाने शब्द वाढणार आहे. अशा परिस्थितीत कमी, पण स्पष्ट बोललेले केव्हाही चांगले. बारीकसारीक गोष्टींचा फारसा विचार करत बसू नका. मतभेद दूर ठेवा. कोणतेही महत्त्वाचे निर्णय या दिवसांत घेऊ नका. नियमबाह्य गोष्टी टाळा.
तूळ : व्यावसायिकदृष्टय़ा गुंतवणूक वाढेल. जुन्या ओळखीचा फायदा होईल. नोकरदार वर्गाने कोणतेही व्यवहार जपून करावेत. आर्थिकदृष्टय़ा समतोल साधा. राजकीय क्षेत्रात कामासाठी वेळ द्यावा लागेल. मित्रांकडून मिळणारी सहानुभूती समाधान वाढवणारी असेल. घरगुती वातावरण ठीक राहील. दिनांक १३, १४ रोजी निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली तरी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. त्यातच अडकून राहू नका.
वृश्चिक : काही दिवसांपूर्वी प्रयत्न करूनही काही गोष्टींना यश मिळत नव्हते. सध्याची स्थिती अशी नाही. प्रयत्नांना निश्चितच यश मिळणार आहे, तेव्हा या वेळेचा उपयोग करून घ्या व कामाला लागा. आतापर्यंत व्यवसायात तडजोड स्वीकारावी लागली, याच तडजोडीचा आता फायदा होणार आहे. मेहनतीचे फळ चांगले मिळेल. नोकरदार वर्गाच्या कामातील शुभ पडघम वाजेल. आर्थिक बाबतीत पोकळी भरून काढाल. राजकीय क्षेत्रात कर्तव्यनिष्ठ राहाल. तरुण वर्गाचे विवाह ठरतील. कौटुंबिक सौख्य मिळेल.
धनू : व्यवसायात अपेक्षित लाभ होईल.कला क्षेत्राला प्राधान्य मिळेल. खरेदी-विक्रीत व्यवहार जपून करा. व्यवसायात स्पर्धा करून चालणार नाही. नोकरदार वर्गाच्या मागण्या वरिष्ठांना मान्य कराव्या लागतील. खर्च कमी करा. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल. कौटुंबिक वादविवाद टाळा. दिनांक ८, ९ रोजी सगळे काही सुरळीत चालू असताना अचानक वातावरण बदलू शकते. तेव्हा हे दोन दिवस चिडचिड करू नका. हे दोन दिवस सोडले तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.
मकर : व्यापारी वर्गाने वनस्पतीजन्य मालाचा साठा मोठय़ा प्रमाणात करणे तोटय़ाचे राहील. गरजेपेक्षा जास्त साठवणूक करू नका. नोकरदार वर्गाला काम चोख केल्याबद्दल कामाचा योग्य तो परतावा मिळेल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्चावर ताबा ठेवा. समाजसेवेच्या माध्यमातून नाहक त्रास ओढवून घेऊ नका. दिनांक १०, ११, १२ या कालावधीत सहनशीलता ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत प्रत्यक्ष डोळय़ांनी पाहत नाही तोपर्यंत त्या गोष्टीच्या संदर्भात काहीही न बोललेले चांगले.
कुंभ : आपला ज्या गोष्टीशी संबंध नाही अशा गोष्टी समोर येणार आहेत. तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. प्रतिक्रिया दिल्याने त्रासाचे प्रमाण वाढेल. शांततेचा मार्ग स्वीकारा. घाईचे निर्णय घेऊ नका.व्यवसायात जी आणि जशी परिस्थिती आहे ती स्वीकारण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये काही बदल करावयाचे झाल्यास थोडे थांबा. सध्याची वेळ योग्य नाही असे समजा. नोकरदार वर्गाला कामासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. आर्थिकदृष्टय़ा बचत करणे योग्य राहील.
मीन : भागीदारी व्यवसायात चाललेल्या घडामोडीत बदल होतील. हे बदल आगामी काळासाठी चांगले ठरतील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवलेले चांगले राहील. नोकरदार वर्गाच्या कामकाजाविषयी वरिष्ठांकडून विचारणा केली जाईल. त्यामुळे कामात हलगर्जीपणा करू नका. आर्थिक व्यवहार जपून करा. दिनांक १०, ११, १२ रोजी कोणतीही बेकायदेशीर गोष्ट करूच नका. इतरांची अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वत:हून प्रयत्न करा.
















