जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 100 ग्रामपंचायतीतील 114 रिक्त सदस्य पदाच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांचेकडून पारंपारिक पध्दतीने प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.
पोटनिवडणूकीसाठीची नामनिर्देशन व माघारीची प्रक्रीया पुर्ण झालेनंतर जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 8 ग्रामपंचयातीमधील रिक्त सदस्य पदासाठी दिनांक 5 जून, 2022 रोजी मतदान होणार असल्यामुळे सदर दिवशी कायदा व सुव्य्वस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून भसावळ तालुक्यातील साकरी, चाळीसगाव तालुक्यातील जामडी प्र ब, जामनेर तालुक्यातील वडगांव बु. मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा, पाचोरा तालुक्यातील खेडगाव, यावल तालुक्यातील डांभुर्णी, राजोरे, हिंगोणा या दिवशी भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यात यावेत, असेही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.