धरणगाव (प्रतिनिधी) मानवी समाजामध्ये विविध समाजाचे एक्य आणि सामाजिक समरसतेचे मोठे महत्त्व आहे ही समरसता वृद्धिगत करणे हीच खरी समाजसेवा आणि राष्ट्रभक्ती आहे, असे प्रतिपादन उज्जैन धामचे बालयोगी राष्ट्रीय संत राज्यसभा सदस्य खासदार उमेशनाथजी महाराज धरणगाव येथील आयोजित कार्यक्रमात 4 नोव्हेंबर रोजी केले.
संत श्री खासदार उमेश नाथजी महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक समरसता जनचेतना अभियान यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत मेहतर वाल्मिकी समाज व धरणगाव शहरातील सर्वोच समाजाचे लोक हे सर्व उपस्थित होते. रामदेव बाबा नगरामध्ये आगमन झाले असता मेहतर वाल्मिकी समाजातर्फे त्यांचे फटाके फोडून उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात संत उमेशनाथजी महाराज यांनी अभियान यात्रेच्या सामाजिक उपदेश विशद केला. याप्रसंगी मेहतर वाल्मिकी समाज सकल पंच व वैदू समाज पंच मंडळ धरणगाव व भारतीय जनता पार्टी धरणगाव, शिवसेना शिंदे गट धरणगाव व आयोजक पापाभाई वाघरे मित्रपरिवार व आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.