भुसावळ (प्रतिनिधी) येथील भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांचे स्वागत जिल्ह्यातील शिक्षक मित्रांतर्फे करण्यात आले.
शिर्डी येथून बदली होऊन आलेले सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळ येथील डीवायएसपी पदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे. २०११ मध्ये प्रशिक्षण घेऊन 2२०१५ ते २०१७ दरम्यान नागपूर येथील एसीपी क्राईममध्ये त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर डीवायएसपी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. गेल्यावर्षी शिर्डी येथील डीवायएसपी पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला होता. तेथून त्यांची बदली भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारीपदी झाली. त्याबद्दल त्यांचे जळगाव जिल्ह्यातील शिक्षक मित्रांतर्फे स्वागत करण्यात आले. जळगाव येथील राहूल चौधरी व मनोज खडके आणि भुसावळ येथील डॉ. जगदीश पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. लेखन व वाचनाची आवड असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.