लंडन (वृत्तसंस्था) सध्या एक पुरुष चर्चेत आला आहे. ज्याचं पोट चक्क प्रेग्नंट महिलेसारखं वाढलं आहे. त्याच्या पोटाचा आकार इतका वाढला आहे की तो ९ महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेसारखा गरोदर असल्याचा वाटतो आहे (Man looks like 9 month pregnant). ज्याच्या वाढलेल्या पोटाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
यूकेच्या साऊथ यॉर्कशायरमध्ये राहणारा ४६ वर्षांचा गॅरी युरिन. ज्याच्या वाढलेल्या पोटाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं पोट इतकं वाढलं की तो प्रेग्नंट आहे की काय असाच प्रश्न सर्वांना पडतो. या पोटामुळे त्याला इतकी लाज वाटते की तो आता घराबाहेरही पडत नाही कारण लोक त्याच्याकडे पाहत राहतात. आता खरंच तो प्रेग्नंट आहे का? त्याचं हे वाढलेलं पोट म्हणजे बेबी बम्प आहे का? असं तुम्हालाही त्याचा हा फोटो पाहून वाटेल. पण त्याच्या या वाढलेल्या पोटाचं कारण प्रेग्नन्सी नाही तर दुसरंच आहे. ते म्हणजे अॅपेंडिक्सनंतर झालेला हर्निया.
यॉर्कशायर लाइव्हशी बोलताना त्याची ५७ वर्षांची पत्नी जुलिया म्हणाली, फेब्रुवारी २०२१ साली अचानक गॅरीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. त्याचं एमआरआय केल्यानंतर समजलं की त्याला अॅपेंडिसाइटिस आहे. रॉदरहॅम रुग्णालयात त्याच्यावरील ३ वेळा सर्जरी टाळण्यात आली. पण त्याचं अॅपेंडिक्स फुटलं आणि लगेच सर्जरी करावी लागली. डॉक्टरांनी सांगितलं की त्याची प्रकृती इतकी बिघडली की सर्जरीवेळीच त्याचा मृत्यू झाला असता पण सुदैवाने त्याचा जीव वाचला. सर्जरी करून अॅपेंडिक्स तर काढण्यात आलं पण त्याच्या मोठ्या आतड्यांमधील एब्डोमिनल वॉल बाहेर आलं त्यामुळे त्याला मोठा हर्निया झाला.
जुलियाने सांगितलं गॅरीला आता खूप समस्या उद्भवतात. त्याला आता ३४ ऐवजी ५४ साइजची जीन्स खरेदी करावी लागते. तो आपले मोजेही स्वतः घालू शकत नाही. लाजेमुळे तो घरातून बाहेर पडत नाही कारण लोक त्याच्याकडे पाहत राहतात. त्याची सर्जरी केली जाणार आहे, त्यानंतरच त्याचं हे पोट कमी होईल. पण कोरोनामुळे सर्जरी वारंवार टाळली जाते आहे. गॅरी आणि जुलिया आता सर्जरीची प्रतीक्षा करत आहेत.