एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडगाव शिवारात जमीन दाखवून जमीन खरेदी करून दिली. मात्र कच्ची खरेदी खत पक्के असल्याचे भासवून प्रत्यक्षात खरेदी करतेवेळी खरेदीखतात बनावटी करून ८४ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात आनंदा रामदास चौधरी, राजेंद्र अमृत धनगर व उमेश श्रीराम पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात एलआयसी एजंट रघुनाथ शंकर निकुंभ (वय ७१ रा. सरस्वती कॉलनी एरंडोल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंदा रामदास चौधरी, राजेंद्र अमृत धनगर व उमेश श्रीराम पाटील यांनी रघुनाथ निकुंभ यांना मोक्याचे ठिकाणचे जमीन दाखवुन तसेच कच्च्या खरेदी खतामध्ये वेंडर उमेश श्रीराम पाटील यांचे मदतीने फेरबदल करुन प्रत्यक्षात अनत्र असलेल्या जमीनीची खरेदी करुन दिल्या. तसेच जमीनीचे मुळमालक माहरु वंजारी यांनी तीन लाख रुपयात गहान खत करण्यासाठी दिलेल्या जमिनी त्यांची व रघुनाथ निकुंभ अशांची दिशाभुल करुन प्रत्यक्ष बाजार मुल्य असलेल्या किंमतीपेक्षा जास्तीची किंमत देवुन व विलास पाटील यांचा प्लॉटमध्ये भागीदार केले. सदरचे व्यवहारामध्ये भागीदार होवुन निम्मे रक्कम जमिनीचे मुळमालक यांना दिल्याचे भासवून सदरच्या व्यवहारामध्ये फुकटात भागीदारी झाल्याचे तसेच सदरचे व्यवहार करतांना मुळमालक व रघुनाथ निकुंभ यांना कच्ची खरेदी खत हे पक्या असल्याचे भासवुन प्रत्यक्षात खरेदी करतेवेळी सदरच्या खरेदीखतात बनावटी करुन फसवणुक केली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.