मुंबई (वृत्तसंस्था) एका पठ्ठ्यानं केवळ ३ शब्दांत आपला राजीनामा (3 Words Resignation Letter) बॉसला दिला आहे. केवळ तीन शब्दांत त्याने आपल्या नोकरीला लाथ मारली आहे. हे गंमतीशीर राजीनामा पत्र सोशल मीडियावर चांगलंचं व्हायरल (Viral) होतंयं. या राजीनाम्याने इंटरनेट युजर्स चांगलेच खूश असून प्रत्येकजण त्यावर आपली प्रतिक्रिया देत आहे.
हे तीन शब्द कोणते? तर ते असे आहेत ‘Bye Bye Sir'(बाय बाय सर) असे हे तीन मॅजिकल शब्द आता लोकांना खळखळून हसवत आहेत. तीन शब्दांचा हा राजीनामा कदाचित जगातला सर्वात लहान आणि कमी शब्दांचा राजीनामा असावा. Maphanga Mbuso नावाच्या ट्वीटर युजरने हा 3 शब्दांचा राजीनामा दिला आहे. या तीन शब्दांच्या राजीनाम्याचा स्क्रीनशॉट त्याने ट्विटरवर शेयर केला आहे. याला त्याने कॅप्शनही अगदी ‘Simple’या एका शब्दाचं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या ट्विटला २ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत तर ५ हजारांहून अधिक लोकांनी याला रिट्वीट केलं आहे. तीन शब्दांचा राजीनामा वाचून लोकांना हसू आवरत नाहीये.
या भन्नाट राजीनाम्यावर ट्विटर यूजर्सनेही फिरकी घेतली आहे. अनेकांनी गंमतीशीर कमेंट्स केल्या आहेत. यात एका यूजरने पोस्टवर लिहिले – किमान ते अद्याप औपचारिक आहे. तर दुसर्याने लिहिले – हे इतके सोपे आणि सरळ आहे की कोणालाही स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. तर तिसऱ्या युजरने लिहिले- टू द पॉइंट. अशा हजारो कमेंट्सने हे पत्र अनेकांपर्यंत पोहोचलं असून यामुळे हसू आवरणं अशक्य झालं आहे.
















