मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे सोबत असलेल्या आमदारांची हाय प्रोफाईल सोय बाबत सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. आमदारांचं बिल थकल्याचं ट्वीट एका व्यक्तीने केलंय. यानंतर मात्र, सोशल मीडियात हास्याचे फवारे उडत आहेत. एवढेच काय आमदारांना दारूची टंचाई भासू लागल्यामुळे गुवाहाटीला हलविल्याची चर्चा होत आहे.
दारूमुक्त असलेल्या गुजरातमध्ये या बंडखोर आमदारांना दारूची टंचाई भासू लागली म्हणून त्यांना गुवाहाटी येथे हलवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे सुरतमधील हॉटेलचे बिल अद्याप प्रलंबित आहे. ए, बी, एबी इत्यादींच्या नावावर सरकारी अधिका-यांनी या ठिकाणी खोल्या बुक केल्या होत्या. यात मद्य बिलामधील अहवालांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे. एवढेच काय आमदारांना दारूची टंचाई भासू लागल्यामुळे गुवाहाटीला हलविल्याची देखील ट्वीटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, विधानपरिषदेचा निकाल लागल्यानंतर शिंदेंच्या गटाने मोठी बंडखोरी करत सूरत गाठलं. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आमदार सूरतेला दाखल झाले. आणि तिकडून थेट गुवाहाटी गाठलं. गुवाहाटीत दिवसेंदिवस आमदारांची संख्या वाढू लागली आणि शिंदे गट आणखी बळकट झाला. पण मागील सहा दिवसांपासून आमदारांची ‘सेव्हन स्टार’ हॉटेलमध्ये सोय कोणी केली, याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण लाखो करोडोचा खर्च करतं कोण आहे?, असा देखील प्रश्न अनेकांना पडला आहे. दुसरीकडे हॉटेलमध्ये आमदारांमध्ये राडा झाल्याच्या बातम्या देखील समोर येतच आहेत.