रत्नागिरी (वृत्तसंस्था) मनसेने(MNS) शिवसेनेला (Shivsena) पाठींबा देत बॅनरच्या माध्यमातून सूचक संदेश दिला आहे. ‘कोकणची भूमी निष्ठावंतांची, ठाकरे बँड वाचवा गद्दारांना ठोका, (Save Thackeray brand) असे या बॅनरमध्ये लिहिण्यात आले आहे. रत्नागिरी मनसेचे (MNS) राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी हे बॅनर लावले आहे.
राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सेना विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे सेनेचा बुरुज ढासळत चालला आहे त्याला भक्कम साथ देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे नाका परिसरात ‘कोकणची भूमी निष्ठावंतांची गद्दारांना ठोका ठाकरे बँड वाजवा’ अशा आशयाचे बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लावण्यात आले आहेत.
सदर बॅनरवर बाजूला भगवी शाल परिधान केलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो आहे. तर दुसर्या बाजूला मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांचा फोटो आहे. सदरच्या बॅनरवरून मनसे आता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ देण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार की काय असाच या बॅनरमधून संकेत मिळत आहेत. सदर बॅनरवरून खेडमध्ये चर्चेला उधाण आले आहे.