नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसेच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर सगळीकडे प्रचंड खळबळ उडालेली आहे. पेगासस हे एक स्पायवेअर आहे. मात्र, हे पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे? याची तुम्हाला माहिती आहे का? तर आज जाणून घेऊया हे पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे?, ते कसं काम करतं आणि ते कुणी बनवलं आहे?.
पेगासस स्पायवेअर कसं हॅक करतं?
ज्या व्यक्तीचा फोन हॅक करायचा आहे त्याला एक वेबसाईटची लिंक पाठवली जाते. ही लिंक ओपन झाली की पेगासस त्याच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतं. शिवाय व्हॉईस कॉल सिक्युरीटी बग आणि व्हॉट्सएप यांच्या माध्यमातूनही पेगासस इन्स्टॉल केलं जाऊ शकतं. पेगाससची सिस्टिम इतकी एडवांस आहे की युजरला मिसकॉल देऊन सुद्धा त्याचा फोन हॅक करता येऊ शकतो. संशोधकांच्या सांगण्याप्रमाणे, युझरच्या मोबाईलवर इन्स्टॉल झालं की त्याचे कॉल लॉग, व्हॉट्सएप चॅट पाहता येतात. व्हॉट्सएपचे मेसेज वाचणं, कॉल ट्रॅक करणं, युझरची अॅक्टिव्हिटी पाहणं या सगळ्या गोष्टी या पेगाससमुळे सहजरित्या केल्या जाऊ शकतात.
पेगाससचे मालक कोणाचे आहे?
पेगाससला इस्त्रायलयातील सर्व्हिलान्स टेक कंपनी एनएसओ ग्रुपने तयार केले आहे. ही कंपनी Q Cyber Technologies नावाने देखील ओळखली जाते. पेगासस हे असे कोणतेही स्पायवेअर नाही जे सहज ऑनलाइन मिळेल. या कंपनीची स्थापना २००९ साली झाली असून, हेरगिरी करण्यासाठी प्रोडक्ट बनवण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते. कंपनीनुसार, एनएसओ कायदा आणि इंटेलिजेंस एजेंसीसाठी डेटा विश्लेषण, सर्च आणि बचाव मोहिम, ड्रोन हल्ल्यांविरोधात उपाययोजना यासाठी देखील उत्पादनांची निर्मिती करते.
कोण हे सॉफ्टवेअर विकत घेऊ शकतं ?
एनएसओचा दावा आहे की, हे सॉफ्टवेअर फक्त सरकारं किंवा सरकारी यंत्रणांना दिलं जातं. सार्वजनिक माहितीनुसार पनामा आणि मेक्सिकोची सरकारं याचा वापर करतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांमध्ये ५१ टक्के सरकारी गुप्तचर यंत्रणा आहेत, ३८ टक्के कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्था आहेत आणि ११ टक्के वेगवेगळ्या देशांचं सैन्य आहे.
एनएसओच्या म्हणण्यानुसार अतिरेक्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि अतिरेकी हल्ले रोखण्यासाठी हे सॉफ्टवेअर विकसित केलेलं आहे. भारत सरकार या कंपनीचं ग्राहक आहे की नाही याची पुष्टी केली जाऊ शकतं नाही. गाबा सिबोनी यांच्या मते, “इस्रायलमध्ये सैन्य आणि सर्व्हेलन्स टेक्नोलॉजीच्या निर्यातीवरून कडक नियम आहेत. या नियमांचं उल्लंघन झालं तर कारवाई होऊ शकते. या रिपोर्टमध्ये दावा केल्या त्याप्रमाणे या सॉफ्टवेअरचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांवर केला जात असेल तर इस्रायल त्यांच्यावर कारवाई करू शकतं.
किती आहे लायसन्सची किंमत?
एनएसओ स्पायवेअरची विक्री लायसन्स स्वरूपात करते व याची किंमत कॉन्ट्रॅक्टवर ठरत असते. एका लायसन्ससाठी कंपनी अधिकतम ७० लाख रुपये घेते. एका लायसन्सद्वारे अनेक स्मार्टफोन्स ट्रॅक करत येतात. २०१६ नुसार, फक्त १० लोकांची हेरगिरी करण्यासाठी एनएसओ ग्रुपने कमीत कमी तब्बल ९ कोटी रुपये घेतले होते. २०१६ च्या प्राइज लिस्टनुसार, एनएसओ ग्रुपने १० डिव्हाइस हॅक करण्यासाठी त्यांच्या ग्राहकांकडून ६,५०,००० डॉलर्स (जवळपास ४.८४ कोटी रुपये) घेतले होते. या व्यतिरिक्त इंस्टॉलेशन फी म्हणून ६ लाख डॉलर्स (जवळपास ३.७५ कोटी रुपये) घेतल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे काही जणांच्या मते सहसा एका गुप्त कराराअंतर्गत हे सॉफ्टवेअर विकत घेतले जाते. कंपनी वेगवेगळ्या सरकारांना वेगवेगळ्या दराने हे सॉफ्टवेअर विकते.
असंख्य लोकांवर पाळत ठेवणे शक्य ?
या स्पायवेअरद्वारे केवळ गुन्हेगारी किंवा दहशतावादासंबंधी घटनांमध्ये सहभागी आहेत. अशा ठराविक लोकांच्या मोबाइलमधील डेटा कलेक्ट केला जातो. जे तसेच, कंपनी पेगासस स्वतः हाताळत नाही व याच्या वापराबाबत माहिती नसल्याचे देखील कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, एनएसओ देशातील सरकार आणि एजेंसीला पेगाससचे लायसन्स देते व स्वतः हे ऑपरेट करत नाही. तसेच, याचा कसा वापर केला जातो याचीही जबाबदारी नाही.
फोनमध्ये हे सॉफ्टवेअर कसे इंस्टॉल केले जाते ?
पेगासस स्पायवेअरचा वापर करून रिमोटली आणि गुप्तपणे फोनमध्ये हे इंस्टॉल केले जाते. पाळत ठेवण्यासाठी फिशिंग मेसेज हे पेगाससला फोनमध्ये इंस्टॉल करण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे. फोन नंबर माहिती नसला तरीही पेगासस सहज इंस्टॉल करणे शक्य असते. फोन नंबर अथवा ईमेल आयडी नसल्यास Base Transceiver Station सारख्या नेटवर्कद्वारे हे सॉफ्टवेअर स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल केले जाते. हे सॉफ्टवेअर Android, iOS, Windows Phone, BlackBerry, Symbian आणि Tizen मध्ये सपोर्ट करते.
कोणता डेटा चोरला जाऊ शकतो ?
पेगासस स्पायवेअरचा वापर करून तुमचे एसएमएस रेकॉर्ड्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, कॉल हिस्ट्री, कॅलेंडर रेकॉर्ड्स, ईमेल्स, इंस्टंट मेसेजिंग आणि ब्राउजर हिस्ट्री हॅकरला मिळू शकते. एनएसओचे प्रोडक्ट ब्रोशरनुसार, पेगासस WhatsApp, Viber, Skype आणि BlackBerry messenger ची सहज हेरगिरी करू शकते. याशिवाय नकळत फोटो काढू शकते, कॉल रेकॉर्ड, आजुबाजूचा आवाज रेकॉर्ड करू शकते व यूजर्सच्या नकळत स्क्रीनशॉट देखील घेऊ शकते. याशिवाय हे स्पायवेअर काम झाल्यानंतर फोनमधून आपोआप डिलीट होते.
हे स्पायवेअर काम करण्यासाठी कशाची गरज ?
पेगासस काम करण्यासाठी मोठे आयटी स्ट्रक्चर असणे गरजेचे असते. यासठी एनएसओ ग्रुपचे कर्मचारी आपल्या ग्राहकांच्या साइटवर जाऊन या सर्व सुविधा इंस्टॉल करतात. कंपनीच्या ब्रोशरवर देखील पेगासस हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ग्राहकांच्या जागेवर इंस्टॉल करण्याची जबाबदारी एनएसओची असल्याचे म्हटले आहे. या सर्वांसाठी वेब सर्वर, कम्यूनिकेशन्स मॉड्यूल, सेल्यूलर कम्यूनिकेशन मॉड्यूल, परमिशन मॉड्यूल, डेटा स्टोरेज, सर्व्हर्स सिक्यूरिटी, सिस्टम हार्टवेअर इंस्टॉलेशन, ऑपरेटर कन्सोल आणि पेगासस अॅपची गरज असते. यासाठी डेस्कटॉपमध्ये कोर आय५ प्रोसेसर, ३ जीबी रॅम आणि ३२० जीबी हार्ड ड्राइव्ह आणि विंडोज ७ ओएस असणे गरजेचे असते. याशिवाय देखील इतर काही ठराविक गोष्टींची गरज असते.