TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यातील कडक लॉकडाउनची तारीख ठरली? ‘या’ दिवसापासून होऊ शकतो १४ दिवसांचा लॉकडाऊन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला असून आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. रुग्णवाढीच्या तुलनेत मृत्यूदर वाढू लागला आहे. १ ते १० एप्रिल या काळात राज्यात तब्बल चार लाख ८८ हजार रुग्ण वाढले असून पावणेतीन हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर १७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन होऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा करणार आहेत. तत्पूर्वी, नागरिकांना जिवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी व परराज्यातील व राज्यातील विविध जिल्ह्यांमधील जे कामगार इतरत्र आहेत, त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वेळ जाणार आहे.

ठळक बाबी

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

– मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जालना, नांदेड व नागपुरात मृत्यूदर वाढला
– राज्यात दहा दिवसांत वाढले चार लाख ८७ हजार ७८८ रुग्ण
– १ ते १० एप्रिल या काळात राज्यभरातील दोन हजार ७४० रुग्णांना कोरोनाने घेतला बळी
– राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये मोठी रुग्णवाढ; दहा जिल्ह्यांमध्ये वाढू लागला मृत्यूदर
– नागरिकांना जिवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी तर कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी दिला जाणार वेळ
– लॉकडाउन काळात लसीकरण सुरु राहण्याची शक्‍यता; उद्दिष्टानुसार प्रत्येक केंद्रांवर टोचली जाईल लस
– शेतकरी, कामगार, उद्योजकांसह सर्वसामान्य घटकांसाठी राज्य सरकार देईल विशेष पॅकेज
– शेतकऱ्यांना सध्या द्राक्ष, संत्रा, कलिंगड, टोमॅटो, कांदा यासह अन्य भाजीपाल्याची चिंता
– लॉकडाउनमध्ये शेतमाल विक्रीसाठी बळीराजाला हवीय शेतमाल विक्रीची सवलत
– १७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन
– आठ दिवसांची की ३० दिवसांचा लॉकडाउन? मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार तारीख

राज्यातील ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर, रायगड, सोलापूर, नाशिक, जालना, नगर, जळगाव, नंदूरबार, औरंगाबाद, लातूर, नांदेड, बुलडाणा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रूग्णवाढ आहे. सार्वजनिक वाहतूक सुरु असल्याने ये-जा करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. आता बहुतेक जिल्ह्यांमध्ये शनिवार, रविवार वगळता सोमवार ते शुक्रवार, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडीत होणे अशक्‍य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी शेतकरी, १२ बलुतेदार, उद्योजक, हातावरील पोट असलेल्यांसाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर करून लॉकडाउन करण्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता ठाकरे सरकार काय सवलत अथवा अर्थसहाय करणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान, लॉकडाउन हा अचानक केला जाणार नसून त्याची नागरिकांना काही दिवस अगोदर पूर्व कल्पना दिली जाणार आहे. त्यामुळे कोणीही बसस्थानक, रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

व्यापारी, शेतकऱ्यांचा विरोध कायम

२३ मार्च २०२० नंतर तब्बल तीन ते चार महिने राज्यात लॉकडाउन करण्यात आला होता. आता व्यापार, उद्योग पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा लॉकडाउन केल्यास आर्थिक अडचणीत भर पडणार असून अनेकांसमोर अडचणींचा डोंगर उभारणार आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून शेतकऱ्यांसमोरील अडचणीही वाढल्या आहेत. आता शेतात अनेक पिके काढायला आली आहेत. त्यातच लॉकडाउन केल्यास हा शेतमाल विकायचा कुठे, या चिंतेत बळीराजा आहे. त्यामुळे निर्बंध कडक करा, परंतु सरसकट कडक लॉकडाउन नकोच, अशी भूमिका शेतकरी व उद्योजकांनी घेतली आहे. या घटकांना राज्य सरकार काय मदत करणार काय सवलत देणार, याकडेही लक्ष लागले आहे.

संकट दूर होण्यासाठी लॉकडाउनची गरज

कडक निर्बंध करूनही अनेकजण नियमांचे पालन करत नाहीत. मागील वर्षापासून नागरिकांना कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, स्वच्छता राखा असे आवाहन केले जात आहे. आता शनिवार, रविवारी बहुतांश जिल्ह्यांमध्ये संचारबंदी असून अन्य दिवशी जमावबंदी आहे. तरीही पोलिसांच्या कारवाईतून हे लक्षात येते की, अजूनही लोक नियम पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी विषाणूची साखळी खंडीत होणे गरजेचे आहे. राज्याची स्थिती सुधारल्यानंतर सर्वच घटकांचे प्रश्‍न सुटतील आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत होऊ शकतात. त्यासाठी १५ दिवसांचा लॉकडाउन गरजेचा आहे, असे मत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत व्यक्‍त केले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोध विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले १,६९,९१२ कोरोनाबाधित ; मृतांच्या संख्येत दुप्पट वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नगरपरिषदेला करवाढी विरोधात सह्यांचे निवेदन सादर !

October 21, 2022

जळगाव-यावलमधील वाहतुकीला येणार गती : ना. गुलाबराव पाटील

May 4, 2022

बीएचआर घोटाळा : कंडारेला जळगावात आणून कसून चौकशी ; मुख्य कार्यालयात पुन्हा एकदा झाडाझडती !

July 6, 2021

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन !

September 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group