जळगाव (प्रतिनिधी) एकनाथ खडसे यामानाथ १९९० मध्ये भाजपात घेतले. पक्षाने त्यांना तिकीट दिले तेव्हा आमदार झाले. त्यावेळेस आमचा मतदारसंघ मात्र शिवसेनेला सुटला. माझा बेस हा आरएसएसचा आहे. कॉग्रेस मधून आलेल्या व एकेकाळी काँग्रेसचे आमदार हरिभाऊ जवरेंची बॅग धरूण मागे फिरणाऱ्या खडसेंनी मला निष्ठा शिकवू नये असा पलटवार मंत्री गिरीष महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर केला आहे.
जामनेर येथे झालेल्या सभेत ना. गिरीष महाजन यांचा एकनाथ खडसेंवर पलटवार आ. एकनाथ खडसे यांनी गिरीष महाजन माझ्यामुळे मंत्री झाले व मी त्यांना मोठे केले असे विधान आपल्या भाषणातून केले होते. त्या वक्तव्याचा आज मंत्री महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना खडसेंचा समाचार घेतला. तसेच खडसे ईतके बोलतात मग त्यांचा मतदार संघात का पराभव होतो. साधी गावाची ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही. नगरपालिका, दुध संघ, जिल्हा बँकेत त्यांचे नामोहरण झाले. मतदार संघात थोड्या बहुत मताने निवडून आलेल्या खडसेंनी माझे मताधिक्य पहावे असा टोला त्यांनी लगावला.
आपण जामनेरचा विकास केल्याच्या खडसेंच्या वक्तव्याचा समाचार घेत ना. महाजन म्हणाले की, खडसेंची स्वतःच्या मतदार संघात बोंब नाही, बोदवडला पिण्यासाठी पाणी नाही, मुक्ताईनगरचा विकास केला नाही, आणि हे माझ्याकडे कधी विकास करायला आले? तिकडे काही केले असते तर त्यांच्यावर नामुष्की आली नसती अशी खोचक टिका त्यांनी केली. त्यांच्या गावात येवून आ. मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला अजून काय पाहीजे असे ही ते म्हणाले.
खडसे कधी भाजपात तर कधी राष्ट्रवादीत सांगतात, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील सुनावले. आ. खडसेंची अशी लाचारी कधी पाहीली नाही.मी मतदार संघासाठी दिवस रात्र काम करतो, रूग्ण सेवा पुरवतो, माझ्या कामावरच मोठा आहे. खडसेंनी कधी कुण्या रूग्णाला सेवा दिली का? वेळ आल्यावर खडसेंचा हिशोब चुकता केला जाईल असे ही ते म्हणाले.