नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका स्मार्टफोनमध्ये मिळणारे काही फीचर्स ठरलेले असतात. परंतु त्याचबरोबर एक खूप छोटासा होल स्मार्टफोनच्या तळाला दिला जातो. अनेकांना हा होल का दिला असावा असा प्रश्न पडतो. हा फक्त होल नाही तर हा स्मार्टफोनसाठी खूप महत्वाचा आहे. या होलचे काम जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.
अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हा एक माईक आहे. परंतु हा फक्त समोरच्या व्यक्तीपर्यंत तुमचा आवाज पोहोचवण्याचं काम करत नाही तर नॉइज कॅन्सलेशनचं देखील काम करतो. हे फिचर कॉलिंगच्या वेळी अॅक्टिव्हेट होते. यामुळे तुमचा आवाज स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. नॉइज कॅन्सलेशनमध्ये तुमच्या आजूबाजूचा आवाज कमी केला जातो आणि तुमच्या आवाजावर जास्त भर दिला जातो. त्यामुळे हा होल जर तुम्ही बुजवला, त्यावर हात ठेवला किंवा त्यात काही अडकलं तर कॉलमध्ये तुमचा आवाज कमी होऊ शकतो. किंवा बॅकग्राऊंड नॉइज वाढून तुमचा आवाज त्यात दबून जाऊ शकतो. म्हणून हा होल नेहमी क्लियर असणं आवश्यक आहे.
Mic काय आहे
Mic खरं तर हा एक Noise Cancelling मायक्रोफोन आहे. जो, कॉलिंग दरम्यान सक्रिय होतो, या मायक्रोफोनचे काम युजर्सचा कॉलिंग अनुभव अधिकाधिक चांगले करणे आहे. जर तुमच्या फोनमध्ये हे फीचर नसते तर तर समोरच्या व्यक्तीपर्यंत तुमचा आवाज पोहोचण्यात अनेक समस्या आल्या असत्या. खरं तर, हे अगदी सामान्य दिसणारे छिद्र कोणत्याही स्मार्टफोनसाठी खूप महत्वाचे आहे.
काय आहे त्याचे काम?
नॉइज लेव्हलिंगचे काम आवाजाची गुणवत्ता सुधारणे आहे, खरे तर उत्तर कॉलवर बोलत असताना अनेक वेळा तुमच्या आजूबाजूला खूप आवाज येतो. पण, तरीही समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज स्पष्टपणे जातो. हा छोटा मायक्रोफोन अगदी जवळच्या आवाजाचा मागोवा घेतो आणि तुमचा आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत जातो.