पुणे (वृत्तसंस्था) पिंपरीमधील एका मुलीचा भाईगिरीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सदर तरुणी भाईगिरीची भाषा बोलताना दिसत आहे. (Pimpri Young Girl Viral Video) तिने आपल्या सोशल गुंडागिरीचे व्हिडिओ इन्स्टावर अपलोड केले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी कुठला डॉन आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील ३०२ असे थेट म्हणताना दिसत आहे. ३०२ हे खून प्रकरणातील कलम असून पोलीसांकडून खूनाच्या आरोपींवर हे कलम लावले जाते. संबंधित तरुणी एवढ्यावरच न थांबता ज्ञान पाजळतानाही दिसून येत आहे. शब्दाने शब्द वाढत असल्याने शिव्या न देता हाणामारी करून भांडणे सोडवायची असेही म्हणताना दिसते. त्यामुळे भुरटी हवा करणाऱ्यांमध्ये आता पुणेकर तरुणींचा सुद्धा सहभाग वाढत चालला की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, सोशल मीडियात वाळली हवा करून नंतर पोलीसांकडून गरम होऊन आल्याची प्रकरणे नवी नाहीत. यामध्ये मिशाही न फुटलेल्या पोरांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. मात्र, आता मुलीही सोशल मीडियात गुंडागिरी करू लागल्याने नेमका कोणत्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे असे विचारण्याची वेळ आली आहे.