TheClearNews.Com
Wednesday, May 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्य बहिष्कृत ; नंदीवाले समाजाच्या सहा जातपंचांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली (वृत्तसंस्था) आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्यांना बहिष्कृत केल्याप्रकरणी नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचाविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील नंदीवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा सुमारे १५० दाम्पत्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. बहिष्कृत केलेल्यांना समाजातील सुख-दु:खाच्या प्रसंगी बोलावले जात नाही.

याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आग्रही होऊन समाजातून बहिष्कृत करणाऱ्यांवर कारवाई करण्यासासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा २०१६ पासून अंमलात आला आहे. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला, कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करणे हा गुन्हा आहे.

READ ALSO

ओडिशातील खून, ५ कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

सबगव्हाण येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जणांविरुद्ध गुन्हा

१५० जोडप्यांना नंदीवाले जातपंचांनी समाजातून बहिष्कृत केले

महाराष्ट्रातील नंदीवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा अंदाजे १५० जोडप्यांना नंदीवाले जातपंचांनी समाजातून बहिष्कृत केले आहे. त्यांना समाजातील कोणत्याही सुखदु:खाच्या कार्यक्रमात बोलावले जात नाही किंवा कोणीही त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत. अशा आंतरजातीय विवाह केलेल्या तीस जोडप्यांनी एकत्रितपणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सातारा यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आणि त्यांच्यावरील सामाजिक बहिष्कार उठवण्याची मागणी केली. त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी नंदीवाले समाजातील जातपंचांशी संपर्क करून त्यांची मेढा (जि. सातारा) पोलीस स्टेशनला जून २०२१ मध्ये बैठक बोलावली.

पोलिसांनी पंचांना सामाजिक बहिष्कार मागे घेण्याची केली विनंती

या बैठकीमध्ये अंनिस कार्यकर्त्यांनी सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार आता कोणालाही समाजातील वाळीत टाकता येत नाही. याची जाणीव करून दिली. तसेच पोलिसांनी पंचांना सामाजिक बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा पंचांनी सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे कबूल केले. त्यानुसार पंचांची पुढील बैठक २६ डिसेंबर २०२१ रोजी कराड येथे होऊन या बैठकीतही राज्यातील आंतरजातीय विवाह केलेल्या कुटुंबांवरील सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले.परंतु नंदीवाले समाजातील काही जातपंचांनी सांडगेवाडी (ता. पलूस) येथे पुन्हा जातपंचायत ९ जानेवारी रोजी बसविली.

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील सामाजिक बहिष्कार सुरू ठेवणार

या जातपंचायतमध्ये त्यांनी कराड येथे जातपंचायतींनी घेतलेला निर्णय अमान्य करून या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील सामाजिक बहिष्कार सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले. पलूस येथील झालेला हा जातपंचायतीचा निर्णय ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्या’नुसार गुन्हा आहे. म्हणून इस्लामपूर येथील आंतरजातीय विवाह केलेले प्रकाश शंकर भोसले यांनी या कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनल 14 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला.

सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद

यामध्ये जातपंचायतीचे पंच विलास शंकर भिंगार्डे (इस्लामपूर) चंद्रकांत बापू पवार (इस्लामपूर) शामराव श्रीरंग देशमुख (दुधोंडी), अशोक शंकर भोसले (दुधोंडी), किसन रामा इंगवले (जुळेवाडी, ता. कराड), विलास बापू मोकाशी (नेहरूनगर, निमणी) या पंचांवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे. सदर गुन्हा नोंद करताना आंतरजातीय विवाह केलेले काही पीडित तरुण उपस्थित होते.

आधी संवाद.. आणि मग कायद्याचा बडगा

नंदीवाले काशी कापडी आणि तीरमल समाजातील आंतरजातीय विवाह केलेल्या अडीचशे जोडप्यांवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याचे त्या समाजातील बहुसंख्य पंचांनी जाहीर केले असले तरी त्यामधील काही पंचांनी नुकतीच पलूस येथे जातपंचायत भरवून काही जोडप्यांच्या वर बहिष्कार चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या जोडप्यांनी सातारा अंनिसकडे तक्रार दिली होती. अंनिसने त्याची तातडीने दखल घेऊन त्यांना घेऊन पलूस पोलीस स्टेशनला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदयानुसार गुन्हा दाखल केला. इस्लामपूर येथील पीडित प्रकाश भोसले यांनी ६ जातपंचायतींवर फिर्याद दाखल केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ओडिशातील खून, ५ कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

May 26, 2026
गुन्हे

सबगव्हाण येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जणांविरुद्ध गुन्हा

May 26, 2026
गुन्हे

विद्यार्थीनीला घरात बोलावून ७२ वर्षीय वृद्धाने केला विनयभंग

May 26, 2026
गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026
गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
Next Post

धक्कादायक ! पुण्यात तरुणीवर कारमध्ये बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड !

August 30, 2022

साकळीत ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’या सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात

October 20, 2020

ग्रामस्थांनी समस्या मांडताच पालकमंत्री तात्काळ अॅक्शन मोडवर !

July 15, 2024

वाढत्या महागाईचा राष्ट्रवादीकडून निषेध ; धरणगाव तहसीलदारांना निवेदन !

October 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group