चाळीसगाव प्रतिनिधी – मध्ये आज दि २८ रोजी शहर विकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे आमदार व चाळीसगाव विधानसभा प्रभारी किशोर पाटील यांची सभा होत आहे. मात्र किशोर पाटील यांच्या भूमिकेमुळे स्थानिक शिवसेना कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहे. त्याचं कारण हे तसंच आहे. ज्या वार्डामध्ये किशोर पाटील यांच्या सभा होत आहे तेथे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत मात्र किशोर पाटील शहर विकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी येत आहेत हे त्याहून आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. फक्त मंगेश चव्हाण यांना विरोध म्हणून किशोर पाटील यांच्या या व्यक्ति द्वेष भूमिकेमुळे चाळीसगावचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले असून कोणता झेंडा घेऊ हाती असा कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे. चाळीसगाव नगर परिषदेमध्ये शिंदे गटाचे ६ उमेदवार उभे असून त्यांच्या प्रचारासाठी शिंदे सेनेचे नेते आमदार किशोर पाटील हे येत नसून फक्त मंगेश चव्हाण यांच्या विरोधासाठी ते शहर विकास आघाडीच्या व्यासपीठावर जाणार आहेत. त्यामुळे शिंदे सेनेच्या उमेदवारांची चांगलीच गोची झाली असून किशोर पाटील यांच्या भूमिकेमुळे स्थानिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.
















