धौलपूर (वृत्तसंस्था) राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने दारूच्या नशेत टल्ली असताना चक्क साप भाजून खल्ला. ज्यामुळे त्याची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. त्याची हालत गंभीर झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
पीपरी पुरा गावात राहणारे तीन मित्र अतर सिंह, जोगिंदर आणि शिवरामने एक दुकान सुरू करण्याचा प्लॅन केला होता. दुकान सुरू करण्याच्या आनंदात तिघांनी गावातील एका शेतात दारूची पार्टी ठेवली आणि दारू ढोसायला सुरूवात केली. दरम्यान शेतातील एका बिळातून एक साप बाहेर आला. जेव्हा दारूच्या नशेत टल्ली असलेल्या तिघांनीही साप पाहिला तर त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण साप पुन्हा बिळात शिरला. त्यानंतर मित्रांनी बिळात पाणी टाकून त्याला बाहेर काढलं. त्यानंतर तिघांनी सापाला मारलं. त्यानंतर अतर सिंहने सापाचा मागचा आणि पुढचा भाग कापून फेकला. मग तिघांनीही मिळून सापाला आगीवर भाजलं आणि नशेत टल्ली तिसरा मित्र अतर सिंहने साप खाल्ला. साप खाल्ल्यावर अतर सिंहची तब्येत बिघडली. त्याची हालत गंभीर झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
जेव्हा दुसऱ्या दिवशी अतर सिंह शुद्धीवर आला तेव्हा त्याने रात्री साप खाल्ल्याची माहिती दिली. ज्यानंतर हॉस्पिटलमधील स्टाफही हैराण झाले. सध्या अतर सिंह धोक्यातून बाहेर आला आहे.