जळगाव (प्रतिनिधी) कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे व अमळनेर कार्यकारी अभियंता प्राजंल पाटील यांच्या बदलीचे आदेश दि. ७ जून रोजी काढण्यात आले. अधिक्षक अभियंता पी.पी. सोनवणे यांच्यावर देखील कार्यवाहीचे आदेश होणे अपेक्षित होते. पण त्यांना वाचविण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
विभागातील विविध भ्रटाचाराच्या तक्रारी केल्या होत्या त्यात तथ्य आढळल्यानंतर प्रशासकिय पातळीवर चौकशी आली त्यात आठ दोषारोपक (चार्जशिट) निश्चीत करण्यात आले त्यानुसार अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या कारवाईची फाईल क्र. ७६६३२० मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली. त्यांनी मान्य करुन पुन्हा ती फाईल विभागाकडे पाठविली त्यानंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी कार्यालयात पाठविण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री यांनी दि. २४मे २०२४ रोजी पुढील कार्यवाहीचे आदेश देऊन पुढील कार्यवाहीसाठी विभागाकडे फाईल आली. परंतू कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे व अमळनेर कार्यकारी अभियंता प्राजंल पाटील यांच्या बदलीचे आदेश दि. ७ जून रोजी काढण्यात आले. यात अधिक्षक अभियंता पी.पी. सोनवणे यांच्यावर देखील कार्यवाहीचे आदेश होणे अपेक्षित होते. पण त्यांना वाचविण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध रस्ते कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून यात शासनाचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे शासनाचे वेळोवेळी लक्षात आणून दिले आहे तसेच विधान परिषदेत देखील आवाज उठविला आहे परंतू राजकीय पाठबळ या अधिकाऱ्यांना असल्याने कारवाईस विलंब होत असल्याचा आरोप करीत आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले की, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, प्राजंल पाटील यांच्यावर दोषारोप निश्चीत असल्याने शासनाने त्यांची दहा दिवसापूर्वी बदलीचे आदेश केले असतांना त्यांना कार्यमुक्त का करण्यात आले नाही यामागे फार मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप आ. खडसे यांनी केला आहे.
दोघांना तात्काळ कार्यमुक्त करा : सुभाष पाटील
कार्यकारी अभियंता सोनवणे व प्राजंल पाटील यांच्या बदलीचे आले असून २४ तासांत कार्यमुक्त करण्याचे आदेश असतांना या दोघांना अधिक्षक अभियंता यांनी अकरा दिवसांपासून कार्यमुक्त का केले नाही? तसेच त्या दोघांना कार्यमुक्त करण्याची शक्यता नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता नाशिक यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी तात्काळ त्या दोघांना कार्यमुक्त करावे अशी मागणी माजी जि.प. सदस्य सुभाष पाटील यांनी केली आहे. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.